IPL 2020 MI vs KKR: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने आले. कोलकाताच्या नेतृत्वबदलाला नशिबाची साथ मिळाली. सामन्याआधी दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं. त्यामुळे त्याच्याजागी पासून KKRचे नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे सोपवण्यात आले. नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी आलेला राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल दोघेही झटपट धावा घेण्याच्या उद्देशाने खेळत होते.

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करायचा असं डोक्यात ठेवून राहुल त्रिपाठीने फटकेबाजी प्रयत्न केला. पहिला फटका उत्तम प्रकारे सीमारेषेपार गेला, पण पुढच्या चेंडू तो बाद झाला. बोल्टने टाकलेला चेंडू राहुल त्रिपाठीने पॉईंटच्या दिशेने मारला. चेंडू वेगाने हवेत जात होत. तोच सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेप घेत त्याला झेलबाद केले. चेंडू वेगाने जात असल्यामुळे झेल टिपला जाईल असं बोल्टलाही वाटलं नव्हतं पण सूर्य़कुमारने झेल घेतला हे पाहिल्यावर गोलंदाज बोल्टही अवाक झाला.

पाहा भन्नाट झेल-

दोन्ही संघात महत्त्वाचे बदल

कोलकाताच्या संघात दोन बदल करण्यात आले. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला. कोलकाताने फलंदाज टॉम बॅन्टन आणि वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी यांना संघातून बाहेर केलं. त्यांच्या जागी संघात ख्रिस ग्रीन आणि शिवम मावीला यांना संधी दिली. मुंबईच्या संघात फारसे बदल केले जात नसले तरी आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जेन्स पॅटिन्सनला संघाबाहेर ठेवण्यात आले. वेगवान गोलंदाजांवर ताण येऊ नये म्हणून त्याला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्या जागी नॅथन कुल्टर-नाईलला संधी देण्यात आली.