30 November 2020

News Flash

IPL 2020: बेन स्टोक्सची विक्रमी खेळी; ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

मुंबईच्या गोलंदाजांची केली तुफान धुलाई

बेन स्टोक्सचं विक्रमी शतक (फोटो- IPL.com)

मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, पण चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने दीडशतकी भागीदारी करत सामना जिंकला. संजू सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५४ धावा केल्या. पण सामन्याचा नायक ठरला बेन स्टोक्स. त्याने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. याचसोबत यंदाच्या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला परदेशी फलंदाज ठरला. आतापर्यंत मयंक अग्रवाल. लोकेश राहुल आणि शिखर धवन या तीन भारतीय फलंदाजांनीच शतक ठोकलं होतं.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने ४० तर इशान किशनने ३७ धावा केल्या. यानंतर शेवटच्या ४ षटकांत मुंबईने तुफान फटकेबाजी करत ७२ धावा मारल्या. हार्दिक पांड्याने नाबाद राहत २१ चेंडूत ६० धावा केल्या. या खेळीत त्याने तब्बल ७ षटकार ठोकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 11:31 pm

Web Title: video of ben stokes match winning hundred first oversee player to score ton in ipl 2020 mi vs rr watch vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: उर्वरित वेळापत्रक जाहीर; ‘असे’ असतील सामने
2 Video : सीमारेषेवर जोफ्रा आर्चरचा भन्नाट झेल, सचिन म्हणतो…घरातला बल्ब बदलतोय
3 Video: बाबोsss….. सूर्यकुमारचा ‘अजब-गजब’ षटकार एकदा पाहाच
Just Now!
X