News Flash

VIDEO: गब्बर is Back! धवनने ‘असं’ ठोकलं दमदार शतक

IPLमध्ये सलग दोन शतकं ठोकणारा पहिलाच खेळाडू

पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने १६० धावांच्या पार मजल मारली. अप्रतिम लयीत असणाऱ्या शिखर धवनने सलग दुसरं नाबाद शतक झळकावत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १६४ धावांची मजल मारून दिली. दिल्लीचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना धवनने मात्र पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि शतक ठोकलं. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

VIDEO: पाहा शिखरचं धमाकेदार शतक

शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. कर्णधार श्रेयस अय्यर, दुखापतीनंतर संघात संधी मिळालेला ऋषभ पंत, अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस आणि धडाकेबाज शिमरॉन हेटमायर यांच्यासोबत भागीदारी करत शिखर धवनने दमदार शतक पूर्ण केलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. IPLमध्ये दोन शतकं लगावणारा तो नववा फलंदाज ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 9:56 pm

Web Title: video of shikhar dhawan blistering hundred ipl 2020 dc vs kxip watch vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: शिखर धवनचा पंजाबला दणका; दिल्लीची १६०पार मजल
2 IPL 2020: धडाकेबाज ‘गब्बर’! सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास
3 IPL 2020: ‘गब्बर’च्या अर्धशतकांबद्दलची रंजक गोष्ट माहिती आहे का?
Just Now!
X