24 January 2021

News Flash

Video: भन्नाट यॉर्करवर डीव्हिलियर्स ‘क्लीन बोल्ड’; विराटही झाला अवाक

नटराजनने टाकलेला चेंडू डीव्हिलियर्सला समजलाच नाही...

जेसन होल्डर, टी. नटराजन आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे Playoffs च्या सामन्यात RCB चा संघ फक्त १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला. एबी डिव्हिलियर्सचा अपवाद वगळता RCB चा एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. डिव्हीलियर्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, टी. नटराजनने २ तर शाहबाज नदीमने १ बळी घेतला.

डीव्हिलियर्सच्या संघर्षपूर्ण खेळीचं साऱ्यांनीच कौतुक केलं, पण खरी चर्चा रंगली ती त्याच्या बाद होण्याची. नव्या दमाच्या भारतीय गोलंदाजाने डीव्हिलियर्सला खेळपट्टीवर स्थिरावलेला असताना त्रिफळाचीत केलं. डीव्हिलियर्ससारखा अनुभवी खेळाडू अर्धशतकानंतर यॉर्करवर क्लीन बोल्ड झाला. टी नटराजन याने त्याला अत्यंत भन्नाट यॉर्कर चेंडू टाकत तंबूत धाडलं. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर विराटही डगआऊटमधून आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसला.

दरम्यान, नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी निवडली. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीकल दोघेही सलामीला येऊन स्वस्तात बाद झाले. फिंच-डीव्हिलियर्स जोडीने डाव सावरत ४१ धावांची भागीदारी केली. फिंच ३२ धावांवर बाद झाल्यानंतरही डीव्हिलियर्सने एक बाजू लावून धरली. त्याने ४३ चेंडूत ५६ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 9:56 pm

Web Title: video super yorker ab de villiers clean bowled t natarajan yorker king virat kohli shocked watch vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: राशिद खानला षटकार लगावत फिंचने केला नवा पराक्रम
2 VIDEO: सुपरकॅच! चेंडू वरून जाताना फिल्डरने हवेत घेतली झेप अन्…
3 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये ‘बाप्पा’ला आहे विशेष स्थान, फोटो व्हायरल
Just Now!
X