24 January 2021

News Flash

VIDEO: सुपरकॅच! चेंडू वरून जाताना फिल्डरने हवेत घेतली झेप अन्…

बाऊन्सर चेंडू पाहताच पडीकलने लगावला होता फटका

IPL 2020 Playoffs च्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूच्या संघाविरूद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघात आरोन फिंचचा समावेश असतानाही विराट कोहलीने देवदत्त पडीकलसोबत सलामीला येणं पसंत केलं. बंगळुरूच्या कर्णधाराचा हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला. डावाच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीला जेसन होल्डरने माघारी धाडलं. त्यानंतर देवदत्त पडीकलकडून बंगळुरूला अपेक्षा होत्या, पण त्यानेही निराशा केली. जेसन होल्डरने पहिल्या षटकात विराटला माघारी धाडल्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने पडीकलचाही काटा काढला. होल्डरने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर पडीकलने हवाई फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगाने जात असतानाच प्रियम गर्गने हवेत झेप घेतली आणि अप्रतिम असा कॅच घेतला.

पाह प्रियम गर्गने टिपलेला अप्रतिम झेल…

देवदत्त पडीकलने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. १५ सामन्यात त्याने ४७३ धावा कुटल्या आहेत. पदार्पणाच्या हंगामात सर्वाधिक पाच अर्धशतकांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. बंगळुरूच्या संघाला अनेकदा चांगली धावसंख्या उभारून देण्यात पडीकलने दमदार खेळी केल्या आहेत. पण आजच्या सामन्यात त्याला ६ चेंडूत केवळ १ धाव करता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 8:21 pm

Web Title: video superb catch priyam garg devdutt padikkal batting jason holder bowling ipl 2020 srh vs rcb vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये ‘बाप्पा’ला आहे विशेष स्थान, फोटो व्हायरल
2 IPL 2020 : ‘विराट’सेनेचं पॅकअप, रंगतदार सामन्यात हैदराबाद ६ गडी राखून विजयी
3 ४-१-१४-४…दिल्लीविरुद्ध बुमराहचा भेदक मारा, संजय मांजरेकर म्हणतात सामनावीर फलंदाज हवा होता
Just Now!
X