05 March 2021

News Flash

IPL 2020 : कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सामन्याला सुरुवात होण्याआधीच झळकावलं द्विशतक

पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकत RCB ची प्रथम फलंदाजी

आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. शारजाच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात विराट कोहली नाणेफेकीसाठी मैदानावर उतरला. विराट कोहलीचा RCB संघाकडून हा २०० वा सामना असणार आहे. एका संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू हा बहुमान विराटच्या नावे जमा झाला आहे.

विराटने RCB कडून आयपीएलमध्ये १८५ तर चॅम्पिअन्स लिगमध्ये १५ सामने खेळले आहेत. २००८ मध्ये एकदा आणि २०१७ मध्ये तीन सामन्यांत विराट RCB कडून खेळला नव्हता.

दरम्यान नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयी सूर गवसलेल्या विराटने पंजाबविरुद्ध सामन्यात संघामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सकडून विराट आपला पहिला सामना खेळला होता. यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट RCB कडून शंभरावा सामना खेळला होता. तर पंजाबविरुद्धचा सामना हा त्याचा २०० वा सामना ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:25 pm

Web Title: virat kohli to played his 200th ipl match for rcb psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 कोहली-एबी डिव्हीलियर्सवर IPLमध्ये बंदी घाला, पंजाबचा कर्णधार राहुलची धक्कादायक मागणी
2 IPL 2020 : …तसं करण्याआधी दोनदा विचार कर, विराटचा राहुलला इशारा
3 तैमूरचा फोटो पोस्ट करत करिनाने विचारलं IPLमध्ये जागा आहे का?? दिल्ली कॅपिटल्सने दिली खुली ऑफर
Just Now!
X