24 February 2021

News Flash

RCB vs DC: IPLच्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

तुम्हाला माहिती आहे का नक्की काय घडलं?

विराट कोहली (संग्रहित छायाचित्र)

IPL 2020 RCB vs DC: बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या या खेळपट्टीवर दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि नवदीप सैनीला वगळून शिवम दुबे आणि शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे. IPLच्या १३ वर्षांच्या इतिहासात जे घडलं नव्हतं, ते या सामन्यात पहिल्यांदा घडलं.

बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना जोशुआ फिलीप स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सलामीवीर देवदत्त पडीकल आण विराट कोहली यांनी डाव पुढे नेला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर विराटने हवेत मारलेला झेल नॉर्येने सोडला, पण अश्विनच्या गोलंदाजीवर मात्र विराटला झेलबाद व्हावं लागलं. IPLच्या १३ वर्षात पहिल्यांदाच अश्विनने विराट कोहलीला बाद केले. विराटचा बळी टिपण्यासाठी अश्विनला तब्बल १३ वर्षे, १९ डाव आणि १२५ चेंडू टाकावे लागले.

अशी पडली विराटची विकेट…

विराट कोहलीने २४ चेंडूत २९ धावा केल्या. या खेळीत विराटने २ चौकार आणि एका षटकार लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 8:57 pm

Web Title: virat kohli wicket by r ashwin first time ever in ipl history rcb vs dc vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: …तर धोनीसाठी ‘ती’ गोष्ट अशक्यच- कपिल देव
2 IPL 2020 RCB vs DC: महत्त्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल
3 CSKचा ‘शेर’ वॉटसन IPL मधून निवृत्त
Just Now!
X