आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. चेन्नई सुपरकिंग्जचा या हंगामातील दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यापासूनच धोनीच्या संघावर क्रिकेटविश्वातील समीक्षकांनी टीका केली आहे. विरेंद्र सेहवागनेही चेन्नई सुपरकिंग्ज संघावर टीका करत फलदाजांना ग्लुकोज पिऊन मैदानात यावं लागेल असं ट्विट केलं आहे.

चेन्नईचे खेळाडू आरामात खेळू शकत नाही आहेत. पुढच्या मॅचसाठी फलंदाजीसाठी ग्लुकोज पिऊन मैदानात यावं लागेल असं सेहवागने म्हटले आहे. याशिवाय सेहवागने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘दिल्ली मेट्रो’ने ‘चेन्नई एक्सप्रेस’चा धुव्वा उडवला. दिल्लीने डॅड आर्मी म्हणजे थालाच्या संघाची शिटी वाजवली. जर तुम्ही टी -२० ऐवजी पर्थच्या पीचसारखं टेस्ट क्रिकेट खेळाल तर त्यापेक्षा मी सुरज बडजात्याचा चित्रपट का नाही पाहणार असं सेहवागने म्हटले आहे.


“चेन्नईची सुरूवात वाईट नव्हती. असं वाटत होतं गाडी दुसऱ्या गियरवर आहे. मुरली विजय भारतीय संघाकडून टेस्ट क्रिकेट खेळतो. त्याला विश्वासचं नव्हता की तो टी-२० क्रिकेट खेळतोय. शेन वॉटसन जे जुनं इंजिन आहे तेही झटके खात नापास झालं. फाफ डु-प्लेसिसने फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला दुसऱ्या लोकांना बरेच समजावं लागलं की हे टी-२० क्रिकेट आहे. तरीही धोनी मैदानावर आला नाही. असं वाटत आहे की बुलेट ट्रेन येईल पण धोनी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येणार नाही. असं वाटत आहे की धोनीला १४ ओव्हर पर्यंत क्वारंटाईन राहायला सांगितलं आहे. मोदीजी तुम्हीच काही तरी सांगा” असे सेहवागने म्हटले.

 

दरम्यान सेहवागने दिल्लीच्या संघातील गोलंदाजांचे कौतुक केले. चेन्नईचा तिसरा सामना २ ऑक्टोबरला सनरायजर्स हैदराबादसोबत होणार आहे.