19 September 2020

News Flash

आजही त्याच जोशात फिल्डींग करतो जॉन्टी ऱ्होड्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक आहे जॉन्टी ऱ्होड्स

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाची स्पर्धा युएईत होत असल्यामुळे सर्व संघांना विजेतेपदाची समान संधी आहे असा जाणकारांचा अंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु यांना कधीही विजेतेपदावर मोहर उमटवता आलेली नाही. त्यामुळे यंदा हे संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स हा यंदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी ऱ्होड्सने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने नाव कमावलं. निवृत्तीनंतरही जॉन्टी ऱ्होड्स तेवढ्याच जोशात मैदानात वावरतो. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सोशल मीडिया हँडलवर जॉन्टी ऱ्होड्स संघातील खेळाडूंना कॅच घेण्याचं तंत्र शिकवताना एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात जॉन्टीने एक सुरेख झेल घेतलाय. पाहा हा व्हिडीओ…

आयपीएलनंतर जॉन्टी ऱ्होड्स स्वीडन क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वीडन क्रिकेट फेडरेशनसोबत त्याचा करार झाला असून आयपीएल संपल्यानंतर तो आपल्या परिवारासोबत स्वीडनला रवाना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 1:51 pm

Web Title: watch amazing fielding skills of jonty rhodes kxip share his video on social media psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : संघ तेच, रणभूमी नवी
2 मराठमोळ्या प्रवीण तांबेला मिळाली IPL मध्ये संधी, मात्र दिसणार नव्या भूमिकेत
3 राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना पुन्हा मिळणार शेन वॉर्नचं मार्गदर्शन
Just Now!
X