आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. एका हंगामात दिल्लीकडून साखळी फेरीत दोनवेळा पराभव स्विकारावा लागण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ ठरली आहे. चेन्नईने हा सामना गमावला असला तरीही रविंद्र जाडेजाने फलंदाजीत अखेरच्या षटकांमध्ये आपली चमक दाखवली. मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत जाडेजाने १३ चेंडूत ३३ धावा केल्या. जाडेजाने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईने १७९ धावांपर्यंत मजल मारली.

अवश्य वाचा – IPL 2020 : चेन्नईच्या पदरी आणखी एक पराभव, पण प्ले-ऑफच्या आशा अजुनही कायम…जाणून घ्या कसं

युएईत खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते आहे. अनेक फलंदाजांनी मारलेले षटकार हे थेट मैदानाबाहेर जाऊन रस्त्यावर पडत आहे. शारजाच्या मैदानावर हा प्रकार आतापर्यंत अनेकदा पहायला मिळाला आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यातही जाडेजाने मारलेला एक षटकार अशाच पद्धतीने मैदानाबाहेर जाऊन रस्त्यावर पडला. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तो चेंडू घेऊन तिकडून पळ काढला. कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे. पाहा हा व्हिडीओ…

विजयासाठी १८० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केलं. फलंदाजीत चमक दाखवणारा रविंद्र जाडेजा गोलंदाजीत तशीच कामगिरी करण्यात अपयशी ठरला. अक्षर पटेलने जाडेजाच्या गोलंदाजीवर ३ षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : सव्याज परतफेड ! चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा अक्षर पटेलने काढला वचपा