19 September 2020

News Flash

‘गब्बर’च्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य शिकतोय भांगडा, हा व्हिडीओ पाहिलात का??

दिल्लीचा पहिला सामना पंजाबविरुद्ध

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व संघातील खेळाडूंना नियमांचं पालन करुन Sponsor Shoot मध्ये सहभागी व्हावं लागतंय.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू शिखर धवन आपल्या संघातील दोन नवे सहकारी अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन यांना शूट दरम्यान भांगडा शिकवताना पहायला मिळाला. महत्वाची गोष्ट म्हणजे अजिंक्य आणि आश्विन या दोघांनीही शिखरच्या तालावर ताल धरत भांगडा करण्याचा प्रयत्न केला. पाहा हा व्हिडीओ…

अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन यांच्या संघात येण्यामुळे दिल्ली संघ व्यवस्थापनाला यंदा आपला अंतिम ११ जणांचा संघ मैदानात उतरवताना भरपूर कसरत घ्यावी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या हंगामात आपला पहिला सामना २० सप्टेंबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळणार आहे.

अवश्य वाचा – Video : कैफचं मार्गदर्शन आणि अजिंक्यचा अचूक थ्रो, पाहा दिल्लीचे खेळाडू कसा सराव करतायत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 5:57 pm

Web Title: watch how shikhar dhawan teach bhangra stapes to ajinkya and ashwin psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 असाच खेळत रहा, लवकरच टीम इंडियात जागा मिळेल ! ‘हिटमॅन’च्या सूर्यकुमारला शुभेच्छा
2 IPL 2020 : चेन्नईविरुद्ध सलामीच्या सामन्यात मुंबईचं पारडं जड – गौतम गंभीर
3 IPL 2020 : CSK समोरची चिंता कायम, ऋतुराज गायकवाड अजुनही करोनाग्रस्त
Just Now!
X