22 January 2021

News Flash

Video : RCB चं यंदा काय होणार?

चाहत्यांना यंदा संघाकडून मोठ्या अपेक्षा

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. एकीकडे आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली यासारखे संघ नेहमी विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या RCB संघाला आतापर्यंत नेहमी अपयशाचा सामना करावा लागला आहे. RCB सोबत दिल्ली आणि पंजाब या संघांनीही आतापर्यंत एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही. RCB चा विचार करायला गेला तर संघ हा विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स या दोन खेळाडूंवरच अवलंबून असतो असं म्हटलं जातं. यासाठी संघ प्रशासनाने तेराव्या हंगामात काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे यंदा RCB चं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे…याचाच घेतलेला आढावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 10:00 pm

Web Title: will rcb do some miracle in ipl 2020 psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL लिलावात बोली न लागल्याचं कधीच वाईट वाटलं नाही – चेतेश्वर पुजारा
2 IPL 2020 : ‘त्या’ विषयावर माझं आणि आश्विनचं एकमत – रिकी पाँटींग
3 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’चा धडाकेबाज फलंदाज दुबईत दाखल
Just Now!
X