News Flash

IPL 2021: सूर्यकुमार यादवचा उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित; पहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सकडून पहिल्या विजयाची नोंद

चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरोधातील सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमार यादवचं आयपीएलमधील हे १३ वं अर्धशतक ठरलं. सूर्यकुमारने जबरदस्त फटकेबाजी करत फक्त ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ४४ धावांवर असताना उत्तुंग षटकार लगावत सूर्यकुमारने अर्धशतक साजरं केलं. मैदानाबाहेर लगावलेला हा षटकार पाहून हार्दिक पांड्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

१० व्या ओव्हरमध्ये प्रसिध कृष्णा गोलंदाजी करत होता. यावेळी सूर्यकुमारने लगावलेला षटकार थेट मैदानाबाहेर गेला. सूर्यकुमारचा हा शॉट पाहून हार्दिक पांड्याला काही काळ आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. आश्चर्यचकित झालेल्या हार्दिक पांड्या त्याच अवस्थेत टाळ्या वाजवताना व्हिडीओत दिसत आहे.

सूर्यकुमारच्या ५६ धावांव्यतिरिक्त फक्त रोहित शर्मा (४३) चांगली खेळी करु शकला. मुंबई इंडियन्सची फलंदाजी पुन्हा एकदा ढासळलेली पहायला मिळाली. आंद्रे रसेलने मुंबई इंडियन्सच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. प्रथम फंलदाजी करणाऱ्या मुंबईने कोलकातासमोर १५३ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

शुभमन गिल आणि नितीश राणाने पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. शुभमन गिल ३३ धावांवर बाद झाला. दरम्यान नितीश राणाने सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. केकेआरचे इतर फंलदाज चांगली कामगिरी करु न शकल्याने मुंबई इंडियन्सने १० धावांनी हा सामना जिंकला आणि सोबत पहिल्या विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 8:53 am

Web Title: ipl 2021 mi vs kkr suryakumar yadav six leaves hardik pandya shocked sgy 87
Next Stories
1 IPL 2021 : पहिल्या विजयाची हैदराबादला उत्सुकता
2 IPL 2021 : राजस्थानला मोठा धक्का, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर!
3 MI vs KKR : मुंबई इंडियन्सने चेन्नईत उभारली विजयाची गुढी
Just Now!
X