रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

* कर्णधार : विराट कोहली

* सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२००९, २०११, २०१६)

* मुख्य आकर्षण : देवदत्त पडिक्कल

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स अशा मातब्बर फलंदाजांचा संघात समावेश असूनही मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला अद्याप एकदाही ‘आयपीएल’ स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी गोलंदाजांची फळीही सक्षम असल्याने बेंगळूरुला पहिल्यावहिल्या जेतेपदाचे वेध घेण्याची संधी आहे. स्थानिक स्पर्धेत सातत्याने धावा करणारा देवदत्त पडिक्कल बेंगळूरुसाठी हुकुमी अस्त्र असेल. त्याशिवाय केरळचा मोहम्मद अझरुद्दीनसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. गतवर्षी एकही षटकार लगावू न शकलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या समावेशामुळे बेंगळूरुची फलंदाजांची फळी अधिक धोकादायक झाली आहे. मधल्या फळीत त्याच्याकडून बेंगळूरुला चौकार-षटकारांच्या आतषबाजीची अपेक्षा आहे. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल यांच्यासह न्यूझीलंडचा कायले जेमिसन या गोलंदाजांची कामगिरी बेंगळूरुचे स्पर्धेतील भवितव्य ठरवेल.

संघ : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मोहम्मद अझरुद्दीन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, फिन अ‍ॅलेन, कायले जेमिसन, डॅनिएल ख्रिस्तियन, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, अ‍ॅडन झम्पा, यजुर्वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, के. एस. भरत, सचिन बेबी, पवन देशपांडे, हर्षल पटेल, रजत पटिदार, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद.

– मुख्य प्रशिक्षक : सायमन कॅटिच