पी. इलान्चेझियान हा शिल्पकार असून तो महिला सक्षमीकरणाच्या अंगाने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. कलारी किंवा जल्लीकट्टू हे खास केरळचे मार्शल आर्ट प्रकार. मार्शल आर्टस् हा आजवर पुरुषांचाच समजला गेलेला प्रांत. पण इथेही महिला वरचढ ठरू शकतात. त्या या मार्शल आर्टस्मध्ये उतरल्या तर अशी कल्पना करून त्याने या शिल्पकृती केल्या आहेत. ब्रॉन्झमधील या शिल्पकृतीमध्ये दोन महिला हातातील शस्त्रासह त्याचा सराव करताना नजरेस पडतात. या शिल्पांमध्ये लय, घनता आणि शिल्पकृतीचा समतोल या सर्व बाबी नेमक्या आल्या आहेत.