22 January 2021

News Flash

सणासाठी खरेदी करताना

खरेदीची पूर्वतयारी करताना प्रथम आपले बजेट नक्की करावे.

० खरेदीची पूर्वतयारी करताना प्रथम आपले बजेट नक्की करावे. काय घ्यायचे आणि किती पैसे खर्च करायचे याची योग्य सांगड घाला.
० बजेट तयार झाल्यावर वस्तूंची यादी तयार करा. यादी करताना घरातील प्रत्येक सदस्याची गरज विचारात घ्या. त्यांचीही मदत घ्या म्हणजे कुठलीही उणीव राहून जाणार नाही.
० अंतिम यादी तयार झाल्यावर तुम्हाला बजेट आणि खरेदी करणार असलेल्या गोष्टींचा अंदाज येईल. बजेट कमी असल्यास शॉर्ट लिस्ट करून बजेटची सांगड घालता यईल.
० खरेदी करण्यापूर्वी आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची नेटवर किंवा इतरांकडून माहिती घ्या. त्या वस्तूची किंमत, गॅरंटी, गुणवत्ता, ब्रॅण्ड याची माहिती करून घ्या, दुकानातील वस्तूंबरोबर त्याची पडताळणी करा. यामुळे वस्तू खरेदी करणे सोपे होईल.
० सण, समारंभात कुणासाठी भेटवस्तू घेताना त्यांची आवड आणि त्या वस्तूचा त्यांना होणारा उपयोग लक्षात घेऊन भेटवस्तू खरेदी करा.
० सणाच्या आधी डिस्काउंट, पे बॅक ऑफर, गिफ्ट वाऊचर, बाय १ गेट १ फ्री यासारख्या आकर्षक ऑफरमधून उगाचच जास्तीच्या वस्तू खरेदी केल्या जातात आणि जुना स्टॉक कमी किमतीत आपल्या गळ्यात पडतो. शक्यतो हे टाळावे.
० सणाच्या काळात रिटेलर्स, स्टोअर्स, आऊटलेटस् यांच्याही ऑफर्स असतात. मात्र त्यात फसवणूक होऊ शकते. घासाघीस केल्यामुळे वस्तू स्वस्त मिळतील पण त्याची हमी देता येणार नाही.
० नेहमी खरेदी करताना ब्रॅण्डेड वस्तू खरेदी कराव्यात. त्यातून वस्तूची गुणवत्ता, विविधता आणि खात्री मिळते. खरेदीचे बिलही मिळते.
० रस्त्यावर लावलेल्या दुकानात घासाघीस करून कमी किमतीत घेतलेल्या वस्तूची खात्री देता येत नाही. त्या हलक्या प्रतीच्या असल्याने टिकाऊपणाची खात्री नसते. म्हणून आपल्याला घ्यायची वस्तू त्याचे मूल्य आणि गुणवत्ता पाहून खरेदी करा.
० सेलमधून वस्तू खरेदी करताना त्यावरील लेबल नीट तपासून पाहा. खाण्याच्या वस्तू असल्यास त्यावरील एक्सपायरी डेट तपासून पाहा.
० सणासाठी मिठाई, चॉकलेट, ज्यूस, बिस्कीटस् यांची फॅमिली पॅक खरेदी करावीत किंवा मोठी पॅक खरेदी करावीत. खरेदी करताना लहान आणि मोठे पॅक याची तुलना करून पाहावे किमतीत किती फरक आहे हे पाहून त्याप्रमाणे खरेदी करावी. मुख्य म्हणजे एक्स्पायरी डेट नीट तपासून पाहावी.
० शॉपिंगला जाताना जास्त पैसे जवळ बाळगू नयेत. कारण गर्दीत हातसफाई करणारे असतात. म्हणून भरपूर खरेदी करावयाची असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करावा.
० तुमचा वेळ वाचवायचा असल्यास ऑनलाइन शॉपिंगचाही पर्याय तुम्हाला निवडता येईल.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2015 1:01 am

Web Title: shopping for the feast
Next Stories
1 आनंदी राहण्यासाठी
2 गॉगल वापरताना..
3 पादत्राणांची देखभाल
Just Now!
X