News Flash

दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मतदनीस सप्टेंबर महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकवेळी मानधनासाठी झगडावे लागत आहे. सेविकांना

| November 16, 2014 05:46 am

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मतदनीस सप्टेंबर महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकवेळी मानधनासाठी झगडावे लागत आहे.
सेविकांना चार हजार रुपये तर मदतनिसांना दोन हजार रुपये असे अल्प मानधन शासनाकडून दिले जाते. हे मानधनसुद्धा कर्मचाऱ्यांना महिन्याला वेळेवर दिले जात नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावी लागतात. शासनाने मानधानासाठी लागणारा निधी दिलेला नाही, असे कारण या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात चौकशी केल्यावर त्यांना असे सांगण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागांतील बहुतांश अंगणवाडी सेविकांचे कुटुंब त्यांच्या वेतनावर चालते. मात्र तीन महिने झाले तरी मानधन मिळत नसल्याने अनेकांना घर चालविणे अवघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला भाऊबीज(बोनस)ची विशेष रक्कम दिली जाते.  ही रक्कमही यावर्षी दिलेली नाही. तसेच शासनाच्या ३० एप्रिलच्या निर्णयानुसार सेविकांना ९५० रुपये, मदतनिसांना ५०० रुपये तर अर्ध सेविकांना ४५० रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ही वाढही अद्याप मानधनात लागू करण्यात आलेली नसल्याने १८ नाव्हेंबरला मंत्रालयावर थाळीनाद मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 5:46 am

Web Title: 2 lakh anganwadi workers waits for honorarium
Next Stories
1 भारतात स्पॅनिश शिकवण्यास स्पेन उत्सुक
2 बेंगळुरूला जगातील तिसरी सायन्स गॅलरी
3 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
Just Now!
X