26 October 2020

News Flash

‘आयआयएम’च्या कॅम्पस निवडीमध्ये अवघ्या ५५ मुली

यआयएममधील टक्का वाढविण्याकरिता गेली काही वर्षे आयआयएम विशेषत्वाने प्रयत्न करीत आहे.

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थेत विद्यार्थिनींची संख्या वाढविण्याचे पद्धतशीर प्रयत्न करूनही त्यात पुरेसे यश आलेले नाही. यंदा अहमदाबाद येथील ‘टॉप’च्या आयआयएममध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सामोऱ्या जाणाऱ्या ३८५ विद्यार्थ्यांमध्ये मुली अवघ्या ५५ (१४ टक्के) आहेत.
आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये हेच प्रमाण २९ टक्के होते. त्या आधीच्या म्हणजे २०१३ मध्ये २२ टक्के आणि २०१२मध्ये हे प्रमाण १७ टक्के इतके होते. बँगलोरचे आयआयएम वगळता इतर आयआयएमच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्येही यंदा थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती दिसते आहे. यंदा येथून ९५ विद्यार्थिनी पदवी मिळवून बाहेर पडतील. तर पुढील वर्षी हीच संख्या ११५वर पोहोचणार आहे.
कोलकाताच्या आयआयएममध्येही विद्यार्थिनींच्या संख्येत घसरणच होणार आहे. यंदा येथून पदवी घेणाऱ्या ४६१ विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थिनी असणार आहेत. तर पुढील वर्षी ही संख्या ९२ इतकी असेल.
विद्यार्थिनींचा आयआयएममधील टक्का वाढविण्याकरिता गेली काही वर्षे आयआयएम विशेषत्वाने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही आयआयएमनी पात्रता निकष शिथिल केले आहेत. मात्र, त्याचा म्हणावा तितका परिणाम होत नसल्याचेच या आकडेवारीवरून दिसते आहे.
दर वर्षी कॅट या आयआयएमकरिता घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला किती विद्यार्थिनी बसतात त्यावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अवलंबून असते; परंतु ६ ते ८ टक्क्यांच्या आसपासच ही संख्या वाढता किंवा कमी होताना दिसते, असे आयआयएमच्या प्रवेश समितीचे अध्यक्ष तथागत बंदोपाध्याय यांनी सांगितले. संस्थेमधील विद्यार्थिनींचा टक्का वाढवितानाच दर्जाशी तडजोड करावी लागणार नाही याची काळजीही आम्हाला घ्यावी लागते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
२०१३मध्ये कोझिकोड आयआयएममध्ये तब्बल ५३ टक्के विद्यार्थिनींना प्रवेश मिळाला होता. पण दुसऱ्याच वर्षी हा आकडा घसरला. ३४६मध्ये या वर्षी अवघ्या १३१ मुली होत्या. सध्या लखनऊच्या आयआयएममध्ये ४२२ पैकी १३६ विद्यार्थिनी आहेत. तर यंदा पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या ४११पैकी १८९ विद्यार्थिनी आहेत.
जगभरात व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. अमेरिकेत एमबीएला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक १०मध्ये चार मुली आहेत; परंतु आयआयएमसारख्या नामांकित शिक्षणसंस्था असूनही भारतात या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुली तुलनेत फारच कमी आहेत. अहमदाबाद, कोलकातासारख्या नामांकित आयआयएममध्येच नव्हे तर रांची (केवळ २८), अमृतसरसारख्या (४५पैकी केवळ ७) नव्याने सुरू झालेल्या आयआयएममध्येही प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या तुलनेत नगण्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:45 am

Web Title: 55 girls selected in imm campus
Next Stories
1 निकष धाब्यावर बसविणाऱ्या १०० महाविद्यालयांची झाडाझडती
2 ‘नालायकांचे सोबती’ अग्रलेखावर व्यक्त होण्याची संधी
3 गोंडवाना विद्यापीठातील आयआयटीशी संलग्न संशोधन केंद्र बंद होणार?
Just Now!
X