26 February 2021

News Flash

पुण्यातील अब्दुल्ला फकिह ‘सीएस’ परीक्षेत देशात पहिला

कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल सोमवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेमध्ये पुण्यातील अब्दुल्ला रशीद फकिह हा देशात प्रथम आला आहे.सीएसची परीक्षा डिसेंबर २०१२

| February 26, 2013 12:56 pm

कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल सोमवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेमध्ये पुण्यातील अब्दुल्ला रशीद फकिह हा देशात प्रथम आला आहे.सीएसची परीक्षा डिसेंबर २०१२ मध्ये झाली होती. या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.  सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये पुण्याचा अब्दुल्ला रशीद फकिह हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. त्याला या परीक्षेमध्ये ७६.७५ टक्के गुण मिळाले आहेत. सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅममध्ये भिलवाडा येथील अमित नोलाखा हा विद्यार्थी आणि फाऊंडेशन प्रोग्रॅममध्ये लुधियानाची निशा गर्ग ही विद्यार्थिनी पहिली आली आहे. सीएसची पुढील परीक्षा १ जूनला होणार आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमची परीक्षा २ ते ९ जून या कालावधीमध्ये होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 12:56 pm

Web Title: abdullah r fakih topped company secretaries exam
Next Stories
1 पुणे विद्यापीठात लवकरच वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम
2 शिवाजीराव मोघेंच्या मतदारसंघात १ मार्चपासून आवाहन यात्रा
3 विद्यापीठ प्रतिनिधींची बैठक निव्वळ फार्स?
Just Now!
X