इंटरमिजिएट ‘भूमिती व अक्षरलेखन’ या पेपरात अक्षरलेखनाचा एक प्रश्न विचारण्यात येतो. हा प्रश्न प्रमाणपट्टीशी निगडित करण्यात येतो. प्रथम प्रमाणपट्टी तयार करण्यास सांगून त्या प्रमाणात एखादा फलक तयार करावयास सांगतात व त्यावर अक्षरे काढावयाची असतात. उदा.- ३ सें.मी.=१ मीटर असे प्रमाण घेऊन ५ मीटपर्यंत योजता येईल अशी प्रमाणपट्टी तयार करा. वरीलप्रमाणे पट्टीच्या आधारे ज्याची एक बाजू २ मीटर आहे, असा नियमित षटकोन काढून त्यात रोमन किंवा रोमन पद्धतीचे प्रकार किंवा कोणत्याही भारतीय लिपीत कोणत्याही प्रचलित पद्धतीने पुढील अक्षरे लिहा किंवा ‘अग्नी-८९’ येथे उदाहरणादाखल मुद्दाम प्रश्न दिला. म्हणजे प्रमाणपट्टी आधी काढून त्या मापाचा दिलेला आकार काढून त्यात अक्षरे काढण्याचा सराव विद्यार्थी करतील.
मूळ रोमन इंग्रजी अक्षरांचे वळण व मूळ देवनागरी अक्षरांचे वण दिले आहे. त्यानंतर विविध शैलीत ही अक्षरे कशी काढता येतील ते दाखवले आहे. अक्षरे तीन पट्टय़ात बसतात, पण याच पट्टय़ांची मापे बदलली, मधला पट्टा मोठा ठेवला तर अक्षरांच्या वळणात शैलीदारपणा निर्माण होतो. तिरपी अक्षरे, वाटोळी अक्षरे, धावती अक्षरे अशा विविध शैलींची अक्षरे तुम्ही काढू शकाल. तसा सराव करा. अक्षरांना शब्दार्थाप्रमाणे थोडी प्रतिकात्मकता देता येते.

उदा.- ‘वनराई’ शब्द कसा काढला आहे ते पाहा. तसाही अभ्यास करा. अक्षरे काढताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी.
१) दिलेल्या आकारात योग्य त्या जागेवर अक्षरे काढा.
२) प्रथम ती पेन्सिलीने हलक्या हाताने काढून योग्य तेवढय़ा जागेत बसतात ना ते पाहा.
३) सर्व अक्षरांची शैली एकच ठेवा.
४) अधिक शब्द असल्यास महत्त्वाचा शब्द मोठा काढा.
५) जाडी सारखी व रेषा काटेकोर काढा
घनभूमिती
इंटरमिजिएट परीक्षेसाठी एलिमेंटरीची ३६ आणि इंटरमिजिएटची ३४ अशी एकूण ७० उदाहरणे सोडवून अभ्यास करावा लागतो. महत्त्वाची उदा. सोडून दाखविली आहेत. परीक्षेत कोणतीही ५ उदा. दिली जातात. त्यापैकी ४ सोडवायची असतात. या उदा. बरोबरच घनभूमीवर आधारित प्रश्न, प्रमाणपट्टी आणि अक्षरलेखन यावर आधारित प्रश्न, असे आणखी दोन प्रश्न विचारण्यात येतात.
घनभूमितीसाठी- १) चौरसाकृती घन, २) समचतुष्कोणाकृती घन, ३) शंकू, ४) सूची, ५) दंडगोल आणि ६) गोल असे ६ आकृत्यांचे उव्दिक्षेप व अनुविक्षेप काढण्याचा अभ्यास करावयाचा आहे. त्यासाठी सोबतची आकृती पाहा.
-सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या, चित्रलीला निकेतन, पुणे

समाप्त

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Secret History of the First Microprocessor
चिप-चरित्र : पहिली ‘बहुउद्देशीय’ चिप!

आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मुक्तहस्तचित्राचे रेखाटन आणि रंगकाम (भाग सहा)
रेखाटन संकल्प चित्रांचे (भाग पाच)
स्मृतिचित्रे कशी काढावी? (भाग चार)
स्थिर चित्र कसे काढावे? (भाग तीन)
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेविषयी (भाग एक)