इयत्ता पहिलीकरिता वयाची अट सहा केल्याने भविष्यात शाळा प्रवेशांमध्ये सुसूत्रता येणार असली तरी हजारो रुपये मोजून जुन्या नियमांनुसार नर्सरी किंवा शिशुवर्ग-बालवर्गाचे प्रवेश शाळांमध्ये निश्चित केलेल्या आपल्या पाल्याचे काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
या वर्षी पहिली प्रवेशाकरिता जुना नियमच असणार आहे. अनेक शाळांचे प्लेग्रुप-नर्सरीपासून शिशुवर्ग-बालवर्गाचेही प्रवेश निश्चित केले आहेत, त्यांना राज्य सरकार संरक्षण देणार का, असा सवाल पालक करत आहेत. ज्या पालकांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुलासाठी नर्सरीमध्ये याच वर्षी प्रवेश निश्चित केला आहे त्याचे काय,’ असा सवाल ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’चे अध्यक्ष जयंत जैन यांनी केला.
शिक्षण हक्क कायद्याला अनुकूल
महाराष्ट्रवगळता राज्यात  पहिली प्रवेशाचे वय सहा पूर्ण आहे. त्यामुळे, प्रवेशांमध्ये सुसूत्रता येईल. हा बदल शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनाही अनुकूल आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हावी.
-अमोल ढमढेरे, उपाध्यक्ष, इंडियन एज्युकेशन सोसायटी