News Flash

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरसकट शुल्कसवलत मिळणार?

तंत्रशिक्षणाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असताना गेल्या वर्षीच्या एका निर्णयामुळे ते रोखून धरले असल्याने सुमारे सहा हजार मागासवर्गीय

| April 11, 2014 05:58 am

तंत्रशिक्षणाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असताना गेल्या वर्षीच्या एका निर्णयामुळे ते रोखून धरले असल्याने सुमारे सहा हजार मागासवर्गीय विद्यार्थी वेठीला धरले गेले आहेत. या महिन्यात जारी केलेल्या शासननिर्णयानुसार या सहा हजार विद्यार्थ्यांनाही शुल्कसवलत लागू होत असून परस्परविरोधी आदेश लागू केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असून सरकारला नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुदत देण्यात आली असून अंतिम सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी पदवी व पदविका, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. ज्या महाविद्यालयांनी थेट अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) अर्ज करून परवानगी घेतली आणि ज्यांना राज्य सरकारने मान्यता देण्यास नकार दिला आहे, अशा महाविद्यालयांमधील जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने १५ मे २०१३ रोजी आदेश काढून शुल्क सवलत नाकारली आहे. याविरूध्द सुमारे २५ याचिका उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असून या जागांवर सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे त्यांना शुल्क सवलत न मिळाल्यास स्वत खर्च पेलावा लागेल किंवा शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येईल. सामाजिक न्याय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा देण्याचे आदेश ३ मार्च व ४ मार्च रोजी काढले आहेत. त्यात गेल्यावर्षी शुल्क रोखून धरलेल्या शासननिर्णयाचा कोणताही उल्लेख नसल्याने सर्वच विद्यार्थ्यांना शुल्काचा परतावा मिळाला पाहिजे, अशी भूमिका अर्जदार विद्यार्थी व महाविद्यालयांनी न्यायालयापुढे नुकतीच मांडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2014 5:58 am

Web Title: backward students to get relaxation in fee
Next Stories
1 ई-लर्निगच्या नावाखाली ठाण्यातील शाळेत शुल्कवाढ
2 एमबीए सीईटीचा निकाल जाहीर
3 शिक्षकांना दिलासा!
Just Now!
X