दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये एक अथवा दोन विषय राहिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळी नापास हा कायमचा शिक्का पडण्याची शक्यता असते. अशांना समाजाकडून नकारात्मक वागणूक मिळते. त्यामुळे ही मुले चुकीच्या मार्गाला जाण्याची अधिक शक्यता असते. या मुलांना मानसिक आधार देऊन त्यांच्या विशेषत्वाला खतपाणी मिळाले तर ही मुले नक्कीच नाव कमावतात.  हा विचार घेऊनच मुळशी राष्ट्रीय सर्वागीण ग्रामविकास संस्थेने आंबडवेट मुळशी येथे नापास मुलांची निवासी हिंमत शाळा सुरू केली आहे.
नापास विद्यार्थ्यांबाबत शाळा, पालक, आणि समाजाचा दृष्टिकोन उदासीन दिसून येतो. काही पालक अशा मुलांचे शिक्षण थांबवतात. त्यांचा गांभीर्याने विचार करीत राष्ट्रीय सर्वागीण ग्रामविकास संस्थेने नापासांसाठी शाळा सुरू केली. शाळा दररोज पहाटे साडेपाचला सुरू होऊन रात्री दहाला संपते. या मुलांची दिनचर्या १६ तासांची असून, त्यात विद्यार्थ्यांना केवळ दहावी-बारावीमध्ये मागे राहिलेल्या विषयांचे शिक्षण दिले जात नाही, तर त्यांच्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक क्षमतांचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात.
संस्थेचे संस्थापक अनिल व्यास यांचा मुळशी तालुक्यातील शाळेमध्ये १५ वर्षांचा संवाद आहे. याच संवादामधून त्यांनी जवळच्या काही शाळांमध्ये शिक्षकांशी-मुख्याध्यापकांशी संपर्क केला. त्यांच्या मनातल्या कल्पना सांगितल्या. शाळा सरांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. दहावीच्या परीक्षेत नापास होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीच चक्क शिक्षकांनी तयार केली. व्यास आणि त्यांचे कार्यकत्रे या यादीतल्या प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन आले. त्यांच्या मनातील शाळेची या मुलांना कसलीही कल्पना न देता एकूण या मुलांचा अभ्यास, भविष्याबद्दलचा योजना याबद्दल संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. दहावीचा रिझल्ट लागला. ज्या ४०-५० विद्यार्थ्यांच्या घरी संपर्क साधलेला होता त्या मुलांच्या घरी मग ही टीम पुन्हा गेली. रिझल्ट काय लागला. पुढे काय करायचे आहे याची विचारपूस केली. १७-१८ विद्यार्थी नापास झाले होते. त्यांना विश्वासात घेऊन शाळेची माहिती दिली आणि नोव्हेंबर २०११मध्ये िहमत शाळेची पहिली बॅच सुरू झाली. पहिल्या बॅचमधील अनिल जाधोर हा इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण घेऊन स्वतच्या पायावर उभा राहिला आहे. अक्षय िशदे हा आपले १२वीचे विषय पास करून पोलीस भरतीचे प्रक्षिक्षण घेत आहे. सचिन आकरे हा विद्यार्थी मोटार मेकॅनिकचे प्रशिक्षण घेऊन पायावर उभा राहिला आहे. दुसऱ्या बॅचमध्ये बुद्धय़ांक कमी असणारा कोल्हापूरचा संतोष काकडे याने प्रवेश घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लक्षात येण्याजोगा बदल झाला, त्याच्या प्रत्येक कृतीत गती निर्माण झाली.
नगर, औरंगाबाद, जालना, दापोली, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर, उस्मानाबाद या परिसरातील मुले यात शिकून गेली. नापास झालं म्हणून निराश न होता पुन्हा एकदा जोमानं स्वतचं आयुष्य स्वतच्या हातात घेण्याचे धडे गिरवू लागली. पहाटे उपासना, व्यायाम, श्रमदान, शालेय विषयांचा अभ्यास, स्वयंअध्ययन, दुपारी विश्रांती, त्यानंतर औद्योगिक विषयांचा अभ्यास, विविध खेळ, त्यानंतर रात्री अभ्यास अशी साधारणपणे दिनचर्या असते. पण, मुले या दिनचय्रेत गुंतून जातात.
या शाळेचे दुसरे वर्ष संपले आहे. तिसरे वर्ष १० एप्रिलपासून सुरू होणार आहे. नापास होणाऱ्या मुलांनी आता खचून जाण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या क्षमतांना पलू पडणारी आणि त्यांना भविष्यात स्वावलंबी बनवणारी सपोर्ट सिस्टीम आता उभी राहिलेली आहे.
संपर्क – ८२७५०५१७२६,
९४२१४४३६५४