13 November 2019

News Flash

विद्यापीठ पातळीवर सहकार्यास ब्रिटन उत्सुक

ब्रिटनमधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांबरोबर करार करण्यास उत्सुक असून ब्रिटनकडून भारतात शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या काही काळात आमची विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठांमध्ये संयुक्त

| February 23, 2013 12:11 pm

ब्रिटनमधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांबरोबर करार करण्यास उत्सुक असून ब्रिटनकडून भारतात शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या काही काळात आमची विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठांमध्ये संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर पिटर बेकिंगहॅम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ब्रिटिश शिष्टमंडळाने नुकतीच भारताला भेट दिली. त्या वेळी भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत ब्रिटनने भारताशी करार केले. या वेळी बेकिंगहॅम म्हणाले, ‘‘आमची विद्यापीठे भारतीय विद्यापीठांशी करार करण्यास उत्सुक आहेत. केंब्रिज, लंडन ही विद्यापीठेही भारतीय विद्यापीठांबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत. संयुक्त अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण, शिष्यवृत्ती अशा विविध गोष्टी शिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्याने सुरू करण्यात येतील. विशेषत: अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या देशातील संशोधन संस्थांकडून भारतात ३ लाख पौंड ( २२ कोटी) ते १०० दशलक्ष (७५ कोटी) रुपयांची गुंतवणूक होईल.’’
शिक्षणाव्यतिरिक्त आरोग्य, सायबर सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे बेकिंगहॅम यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘मुंबई-बंगळुरू आर्थिक पट्टय़ामध्ये होणारा विकासाचा दर लक्षात घेता या पट्टय़ामध्ये गुंतवणूक करण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे यांचाही समावेश आहे. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत यापूर्वीही भारताबरोबर करार करण्यात आले आहेत. सायबर सुरक्षेबाबत शिक्षण, पायाभूत साधने अशा विविध धर्तीवर ब्रिटन आणि भारत एकत्रित काम करणार आहेत.’’

First Published on February 23, 2013 12:11 pm

Web Title: britain interest in co opration on university lavel