News Flash

कॉस्ट अकाऊंटन्सी

गेल्या काही वर्षांत कॉस्ट अकाऊंटन्सी क्षेत्राला उत्तम मागणी असून यासंबंधीचे कार्यक्षेत्र विस्तारत आहे. करिअरच्या उत्तम संधी देणाऱ्या या क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी..

| June 2, 2013 04:36 am

गेल्या काही वर्षांत कॉस्ट अकाऊंटन्सी क्षेत्राला उत्तम मागणी असून यासंबंधीचे कार्यक्षेत्र विस्तारत आहे. करिअरच्या उत्तम संधी देणाऱ्या या क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी..
इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स :
अभ्यासक्रम- फाऊंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रम. प्रवेशाचे टप्पे : बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला प्रवेश दिला जातो. फाऊंडेशन परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर १८ महिन्याच्या कालावधीचा इंटरमिजिएट अभ्यासक्रम करावा लागतो. कोणत्याही शाखेतील पदवीधराला या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर १८ महिने कालावधीचा अंतिम अभ्यासक्रम करावा लागतो. तीन वर्षांच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणासह अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली जाते. यानंतर ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकौन्टन्ट ऑफ इंडिया’चे कॉस्ट अकौन्टन्ट म्हणून सदस्यत्व प्रदान केले जाते. हे उमेदवार वाणिज्य शाखेतील पीएच.डी.साठी पात्र ठरतात.
कॉस्ट अकाऊंटन्ट्सचे कार्यक्षेत्र :
कॉस्ट अकाऊंटन्ट्सना सध्याच्या काळात विविध खासगी, सार्वजनिक आणि शासकीय क्षेत्रातील विविध प्रकारच्या लेखा परीक्षणाची कामे आणि प्रक्रियांसाठी मोठी मागणी आहे. त्यांना विद्यापीठांमध्ये कॉस्ट मॅनेजमेन्ट हा विषय शिकविण्याचीही संधी मिळते अथवा सल्लगार कंपनी सुरू करू शकतात. कॉस्ट अकाऊंटस् संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त करून स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू करता येते. कॉस्ट अकाऊंटन्टस पुढील क्षेत्रात सेवा देऊ शकतो- कार्पोरेट क्षेत्राचे कॉस्ट ऑडिट सहकार क्षेत्राचे कॉस्ट ऑडिट बँकांचे स्टॉक ऑडिट, केंद्रीय एक्साइज ऑडिट, सेबीचे अंतर्गत ऑडिट.
हा अभ्यासक्रम केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या कौशल्यामुळे अनेकांना कार्पोरेट, खासगी व सार्वजनिक कंपन्यांमध्ये वित्त नियंत्रक, वित्तीय व्यवस्थापक, वित्तीय संचालक, मुख्य वित्तीय अधिकारी, कॉस्ट कन्ट्रोलर, चीफ इंटर्नल ऑडिटर, चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर यासारख्या उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. पत्ता- वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, रोहित चेंबर्स, चौथा मजला, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी०२२- २२८७२०१०, वेबसाइट- www. icwa-wirc-org
 * बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्शिअल अ‍ॅण्ड कॉस्ट अकाऊंटिंग :
इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्ससाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्शिएल अ‍ॅण्ड कॉस्ट अकाऊंटिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान तीन वर्षे आणि कमाल सहा वर्षांचा आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदविलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम समांतररित्या करता येतो. अभ्यासक्रमाची फी- सहा हजार रुपये. वयाची मर्यादा नाही. हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
* सर्टिफिकेट इन अकाऊंटिंग टेक्निक :
या संस्थेने सर्टिफिकेट इन अकाऊंटिंग टेक्निक हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. केंद्रीय कंपनी व्यवहार (कार्पोरेट अफेअर्स) मंत्रालयाच्या सल्ल्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लेखा देखभाल, आयकर रिटर्न्‍स तयार करणे, सेवा कर निर्धारण, कंपनी कायद्यानुसार रिटर्न्‍स भरणे, आयकराच्या अंतर्गत रिटर्न्‍स भरणे, सेवा कर, आयात निर्यातीची कागदपत्रे, केंद्रीय अकबारी कस्टम कायदे आदी
विषयांचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना विभागीय केंद्राकडे नाव नोंदवावे लागेल. अभ्यासक्रमाची फी ८६०० रुपये. अभ्यासक्रमाचे साहित्य इंग्रजी आणि हिंदीमधून उपलब्ध करून दिले जाते. ही परीक्षा ऑनलाइन होते. पत्ता- द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट ऑफ इंडिया, डायरेक्टोरेट ऑफ अकाऊंटिंग टेक्निक, सीएमए भवन, ३ इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड, न्यू दिल्ली- १००००३, दूरध्वनी- qrr-suwssrvw, वेबसाइट- www. icmai.in, ई-मेल- catdelhi@icmai.in
* सर्टिफिकेट इन बिझनेस स्किल्स :
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने वित्तीय व्यवस्थापनाअंतर्गत सुरू केलेले काही अभ्यासक्रम-
*  सर्टिफिकेट इन बिझनेस स्किल्स :
या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान सहा महिने आणि कमाल दोन वर्षे. फी- अडीच हजार रुपये. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. व्यवसाय संवादकौशल्य, उद्योजकता, मूलभूत संगणकीय ज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि अकाऊंटिंग या विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
* डिप्लोमा इन फायनान्स, बजेट अ‍ॅण्ड अकाऊंटिंग
अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष आणि कमाल चार वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. वयाची मर्यादा नाही. फी- ९ हजार रुपये. पंचायत राज्य संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा या संस्थेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम विशेषत्वाने तयार करण्यात आला आहे.
* सर्टिफिकेट इन आंत्रप्रेन्युरशिप : या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान सहा महिने आणि कमाल दोन वर्षे. फी- एक हजार रुपये. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. युवकांमध्ये उद्योजकता वाढावी, या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
* सर्टिफिकेट इन नॉन गव्हर्नमेन्ट ऑर्गनायझेशन :
याअभ्यासक्रमाचा कालावधी किमान सहा महिने आणि कमाल दोन र्वष. फी- दीड हजार रुपये. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण किंवा स्वयंसेवी संस्थांच्या कामाच्या तीन वर्षांच्या अनुभवासह दहावी उत्तीर्ण. स्वयंसेवी संस्था चालविण्यासाठी लागणारे मूलभूत व्यवस्थापकीय ज्ञान उमेदवारांना मिळण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
* बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी :
हा अभ्यासक्रम द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या अभ्यास मंडळाच्या सहकार्याने चार्टर्ड अकाऊंटन्सीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत्वाने सुरू करण्यात आला आहे. कालावधी किमान तीन वर्षे आणि कमाल सहा वर्षे. फी- सहा हजार रुपये. अर्हता- बारावी उत्तीर्ण. पत्ता- स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी, मदान घारी, नवी दिल्ली-१०००६८, दूरध्वनी- ०११-२९५७३०४१, २९५३२०७३. ईमेल- soms@gmail.com, वेबसाइट- www.ignou.ac.in
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेन्ट ही संस्था सप्लाय चेन मॅनेजमेन्ट क्षेत्रातील विविध विषयांवर शिक्षण प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आपल्या देशात रिटेल बिझनेस झपाटय़ाने वाढत आहे. महाराष्ट्राला देशाचे रिटेलिंग हब असा गौरव प्राप्त झाला आहे. या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. या संस्थेच्या अभ्यासक्रमांची रचना त्या अनुषंगाने  करण्यात आली आहे. संस्थेने पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी  असे विविध स्वरूपाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
डिप्लोमा इन स्टोअर मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रेड
दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी एक वर्ष. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. दोन वर्षांचा अनुभव असल्यास उत्तम. दोन्ही अभ्यासक्रम हे दूरशिक्षण पद्धतीने करता येतात. पत्ता- नॅशनल हेडक्वॉर्टर्स, प्लॉट नंबर १०२ आणि १०४,  सेक्टर-१५, इन्स्टिटय़ूशनल एरिया, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई४००६१४. दूरध्वनी-०२२-२७५६५५९२. वेबसाइट- www.iimm.org ई-मेल- iimmedu@mtnl.net.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 4:36 am

Web Title: career as a cost accountant
Next Stories
1 वित्तीय अभ्यासक्रम
2 चवींचे शास्त्र
3 पाठय़पुस्तकांतील चुका टाळण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष
Just Now!
X