फॅशन डिझायिनगमध्ये सर्जनशीलतेला मोठा वाव आहे. देशातील देशातील फॅशन जगताची उलाढाल केवळ २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून या क्षेत्रातील संधी विस्तारत आहेत. यासंबंधीच्या अभ्यासक्रमात मार्केटिंग, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यांचा समावेश असल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांना तंत्र, कला आणि व्यवसाय याचे तिहेरी प्रशिक्षण मिळते.
फॅशन डिझायिनग ही कला आहे. मात्र या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्जनशीलतेसोबतच यासंबंधीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं तितकंच गरजेचं असतं. यासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी नावाजलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी चाचणी परीक्षा पार कराव्या लागतात.
 नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी :
फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील डिझाइन, मॅनेजमेंट आणि तंत्रज्ञानसंबंधीचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी दर्जेदार संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. २६ वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयानं केली. या संस्थेला स्वत: पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता, पाटणा, भोपाळ, रायबरेली, शिलाँग येथे शिकवले जातात.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद कानपूर, कांग्रा, कोलकोता, पाटणा, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे ३३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन :
हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, रायबरेली येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे १२० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन एॅक्सेसरी डिझाइन :
हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, गांधीनगर, हैद्राबाद कांग्रा, कोलकाता, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे २४० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे ३३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे २१० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हेद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे १५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अ‍ॅपेरल प्रॉडक्शन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता आणि जोधपूर येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३२ उमेदवार याप्रमाणे ३३२ उमेदवारांना प्रवेश दिला जातो.

  • राखीव जागा : या अभ्यासक्रमासाठी पुढीलप्रमाणे राखीव जागा आहेत. अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती ७.५ टक्के, ओबीसी २७ टक्के, शारीरिकदृष्टय़ा अपंग ३ टक्के. संबंधित राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के. ही सवलत भोपाळ, पाटणा, कांग्रा, शिलाँग, जोधपूर, भुवनेश्वर या केंद्रातील प्रवेशासाठी लागू आहे.
  • प्रवेशप्रकिया : या संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेशपरीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर केंद्रांचा समावेश आहे.
  • अर्हता : बॅचरल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण. बॅचरल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्हता – कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
  • परीक्षेचा पॅटर्न : बॅचरल ऑफ डिझाइनच्या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी जनरल एबिलिटी टेस्ट, क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्ट आणि सिच्युएशन टेस्ट असे तीन टप्पे आहेत. जनरल एबिलिटी टेस्टला ३० टक्के वेटेज, क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्टला ५० टक्के महत्त्व आणि सिच्युएशन टेस्टला २० टक्के महत्त्व दिले जाते.
  • जनरल एबिलिटी टेस्ट : ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. चुकलेल्या प्रत्येक उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातात. अचूक उत्तराला एक गुण दिला जातो. ही परीक्षा जनरल एबिलिटी टेस्ट या नावाने ओळखली जाते. या पेपरमध्ये क्वान्टिटिव्ह एबिलिटी, कम्युनिकेशन एबिलिटी, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, अ‍ॅनालिटिकल एबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि करंट इव्हेन्टस् या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
  • क्वांटिटिव्ह एबिलिटी टेस्ट : यामध्ये अ‍ॅडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फ्रॅक्शन्स, वर्क अँड टास्क, रेशो अँड प्रपोर्शन, डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, परसेन्टेज, रेट ऑफ इंटरेस्ट, अलजेब्रा, जॉमेट्री यांचा समावेश राहील.
  • कम्युनिकेशन एबिलिटी टेस्ट : यामध्ये उमेदवाराच्या इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जाते.
  • इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन टेस्ट : यामध्ये दिलेल्या उताऱ्यावर प्रश्न विचारले जातील. त्याद्वारे विद्यार्थ्यांची संबंधित आकलन क्षमता तपासली जाते.
  • अ‍ॅनालिटिकल एबिलिटी टेस्ट : यामध्ये दिलेल्या माहितीवरून उमेदवारांची कार्यकारणभाव विषयक तसेच विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते.
  • जनरल नॉलेज अ‍ॅण्ड करंट अफेअर्स टेस्ट : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी संबंधित चाचणीत त्यासंबंधित प्रश्न विचारले जातात.
  • क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्ट : या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा फॅशन डिझाइनच्या अनुषगांने असलेला सर्जनशील कल तपासला जातो. यामध्ये विचारक्षमता,
    रंगसंगतींचे आकलन, निरीक्षण, एखाद्या नावीन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती, रेखांकनाची क्षमता यासारख्या बाबींची चाचपणी केली जाते.
  • सिच्युएशन टेस्ट : एखाद्या डिझाइनसाठी उपलबध असलेल्या साहित्याचा वापर संबधित विद्यार्थी कौशल्याने कसा करतो, ही बाब या चाचणीद्वारे तपासली जाते.
  • बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जनरल एबिलिटी टेस्ट घेतली जाते. या चाचणीला १०० टक्के महत्त्व देण्यात येते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने
    घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल ‘एनआयएफटी’च्या वेबसाइटवर घोषित केला जातो आणि टपालाद्वारे यशस्वी उमेदवारांना कळवला जातो.
  • अर्थसाहाय्य : अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना युनियन बँक ऑफ इंडियामार्फत शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी संस्थेमार्फत साहाय्य केलं जातं. या शैक्षणिक कर्जाचा व्याजदर हा ११.५ टक्के आहे. मुलींनासुद्धा याच व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ टक्के आहे. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना आíथक साहाय्य केलं जातं. प्रत्येक सत्राला साधारणत: ७५ हजार रुपये शुल्क आकारले जाते.

मुंबई केंद्राचा पत्ता : एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर नंबर ४, खारघर नवी मुबंई- ४१०२१०, दूरध्वनी-०२२२७७४७००. वेबसाइट- www.nift.ac.in ई-मेल Fnift.mumbai@nift.ac.in

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”