18 January 2021

News Flash

सागरी लाटांवर स्वार व्हा..

जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांची ओळख झ्र् जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे

| April 26, 2013 05:09 am

जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांची ओळख –

जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम –
इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सटिीने सुरू केले आहेत. या संस्थेची स्थापना २००८ साली केंद्रीय युनिव्हर्सटिी म्हणून करण्यात आली. संस्थेच्या वतीनं पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेची मुंबई, चेन्नई, कांडला पोर्ट, कोलकाता, कोचीन आणि विजाग येथे कॅम्पस आहेत.
संस्थेच्या स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीजतर्फे पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स :
हा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई, कोलकाता, कोचीन कांडला पोर्ट येथे शिकवला जातो.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाची फी पुरुष उमेदवारासाठी २ लाख २० हजार रुपये तर महिला उमेदवारासाठी १ लाख ४० हजार रुपये आहे. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.

बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स :
हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चेन्नई आणि मुंबई या कॅम्पसमध्ये शिकविला जातो.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. या अभ्यासक्रमाची फी पुरुष उमेदवारासाठी २ लाख २० हजार रुपये तर महिला उमेदवारासाठी १ लाख ४० हजार रुपये आहे. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचे आहेत.

बॅचलर ऑफ सायन्स इन मेरीटाइम सायन्स :
स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीजमार्फत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा तीन वर्षे कालावधीचा असून तो मुंबई कॅम्पसमध्ये शिकवला जातो.  अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा आहे.

बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन मरिन इंजिनीअिरग :
स्कूल ऑफ मरिन इंजिनीअिरगतर्फे हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा निवासी अभ्यासक्रम आहे.

बॅचलर ऑफ सायन्स इन शिप बिल्डिंग अ‍ॅण्ड रिपेअर :
स्कूल ऑफ नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरगतर्फे हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम कोचीन कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.

बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग :
संस्थेच्या स्कूल ऑफ नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरगने अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये शिकविला जातो.
अर्हता : बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.
प्रवेश प्रकिया : या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा १ जून २०१३ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०१३. अभ्यासक्रमांचा प्रारंभ १ ऑगस्ट २०१३ रोजी होईल.
महाराष्ट्रातील या परीक्षेची केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइनच करावा लागेल.
प्रवेश परीक्षेचा पेपर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट या विषयांवर आधारित राहील. हा अभ्यासक्रम बारावी सीबीएससी, राज्य बोर्ड, आयसीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. या अभ्यासक्रमांसाठी  www.imu.edu या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतो. संस्थेला अर्ज भेटण्याची अंतिम तारीख १० मे २०१३.

बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन मरिन इंजिनीअिरग :
बारावीनंतरचा बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन मरिन इंजिनीअिरग या चार वष्रे कालावधीच्या अभ्यासक्रमामुळे उत्तम प्रकारचं करिअर करता येणं सहज शक्य होतं.
हा अभ्यासक्रम जहाजाच्या अभियांत्रिकी म्हणजेच तांत्रिकी बाबींशी निगडित आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर ज्युनिअर इंजिनीअर ते चीफ इंजिनीअर अशी प्रगती सहा ते सात वर्षांत होऊ शकते. वेतनही दरमहा ३५ हजार ते चार लाख रुपयांपर्यंत या कालावधीत वाढू शकते. या अभ्यासक्रमाला २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा निवासी अभ्यासक्रम आहे.
हा अभ्यासक्रम पुणेस्थित महाराष्ट्र अ‍ॅकेडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेिनग या नामांकित संस्थेने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमाला डायरेक्टर जनरल शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे.
मरिन इंजिनीअिरग आणि नॉटिकल सायन्स : अर्हता आणि फी- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मरिन इंजिनीअिरग या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्हता पुढीलप्रमाणे आहे. बारावी सायन्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण, दहावी किंवा बारावीत इंग्रजीत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक) केलेल्या विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. संपूर्ण बारावीच्या गुणांची एकत्रित सरासरी लक्षात घेतली जात नाही.

बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स :
या संस्थेनेच तीन वष्रे कालावधीचा हा अभ्यासक्रम जहाजाचे दळणवळण, प्रत्यक्ष जहाजावरील व्यवस्थापन किंवा कार्गो हँडिलग म्हणजे जहाजावील वाहतुकीशी निगडित आहे.
या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम केल्यानंतर डेक कॅडेट ते जहाजाचा कॅप्टन अशी प्रगती करता येणे शक्य आहे.
माहिती पत्रकासाठी  www.manetpune.com या वेबसाइटवर संपर्क साधावा. पत्ता : गेट नंबर-१४० लोणी कालभोर, राजबाग, पुणे-सोलापूर हायवे, पुणे ४१२२०१. दूरध्वनी : २६९१२९०१/ ०२/ ०३/ ०४. ईमेल – admissions@manetpune.com
२३ मे २०१३ पर्यंत संस्थेच्या वेबसाइटवर अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाइटवरून डाऊनलोड केलेला अर्ज १००० रुपयांच्या डीडीसह पाठवावा लागेल. हा अर्ज २३ मे २०१३ रोजी किंवा त्याआधी दुपारी चार वाजेपर्यंत संस्थेला मिळणे आवश्यक आहे.
२७ मे २०१३ रोजी देशभरातील २५ शहरांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई या केंद्रांचा समावेश आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारितच गुणवत्ता यादी तयार केली जाईल. परीक्षेचा निकाल ४ जून २०१३ रोजी घोषित होऊ शकतो. हा निकाल संस्थेच्या वेबसाइटवर घोषित केला जाईल. १९ जून २०१३ ते २७ जून २०१३ पर्यंत काऊन्सेलिंग केले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 5:09 am

Web Title: career in sea and marine fields
टॅग Experience,Job,Ssc
Next Stories
1 तेल आणि ऊर्जा क्षेत्र
2 बारावीनंतर थेट व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास
3 बारावीनंतर थेट व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास
Just Now!
X