अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची आगेकूच सुरू असून या क्षेत्रात उच्च दर्जाचं संशोधन भारतात होत आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
या क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमांची ओळख
क्षेत्रात नव्या उर्जेचे आणि प्रखर बुद्धिमत्तेचे विद्यार्थी यावेत यासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या स्वायत्त संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या डिपार्टमेन्ट ऑफ स्पेसने केली. केरळमधील वालीमाला येथे असलेल्या या संस्थेत अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. ही संस्था थिरुवनंतपूरमपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. या संस्थेत जागतिक संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संस्थेमधील पदवी अभ्यासक्रम : बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन एरोस्पेस इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एविअ‍ॅनिक्स, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फिजिकल सायन्स. बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन एरोस्पेस इंजिनीअिरग या अभ्यासक्रमात अवकाशयान निर्मिती, अवकाश अंतराळात धाडण्यासाठी लागणारी वाहनांची निर्मिती, स्प्४आक्रॉफ्ट ,उड्डाण तंत्र  आदी अशासारखे विषय शिकवले जातात.
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एविअ‍ॅनिक्स या अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेट्रिकल इंजिनीअिरग या विषयाशी निगडित नियंत्रण पद्धती, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सिस्टीम यासारखे विषय शिकवले जातात. अंतराळ वाहन प्रक्रिया, उपग्रह निर्मिती प्रक्रियेवर भर देण्यात येतो. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फिजिकल सायन्स या अभ्यासक्रमात अंतराळ संशोधनाला ठळकपणे प्राधान्य दिलं जातं. अंतराळ तंत्रज्ञान आणि अवकाशास्त्राशी निगडित अप्लाईड मॅथेमॅटिक्स, क्लासिकल आणि मॉडर्न फिजिक्स रिमोट सेन्सिंग यासारखे विषय शिकवले जातात.
या संस्थेत प्रवेश मिळालेल्या प्रत्येक उमेदवाराला शैक्षणिक शुल्क, निवास, भोजन यासाठी साहाय्य दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तसेच डिपार्टमेन्ट ऑफ स्पेसमध्ये अभियंते किंवा शास्त्रज्ञ म्हणून सामावून घेतले जाऊ शकते.
प्रवेश प्रक्रिया :
गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या संस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जात असे. मात्र यंदापासून या संस्थेतील प्रवेशासाठी आयआयटीमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE-MAIN आणि JEE- ADVANCED परीक्षेचा स्कोअर ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. त्यामुळे JEE-MAIN मध्ये चांगले गुण प्राप्त करून JEE- ADVANCEDसाठी पात्र ठरणे आवश्यक ठरतं a. JEE- ADVANCED मध्ये पुढीलप्रमाणे गुण प्राप्त झाल्यानंतरच संस्थेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. खुला संवर्ग- फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॉटिक्स या विषयात प्रत्येकी ५ टक्के गुण आणि तिन्ही विषयांत सरासरीने किमान २० टक्के गुण मिळणं आवश्यक ठरतं. इतर मागास संवर्ग( नॉन क्रिमी लेअर)- खुल्या संवर्गातील उमदेवारांसाठी निर्धारित गुणांपकी किमान ९० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जाती आणि शारीरिकदृष्टय़ा संवगखुल्या संवर्गातील उमदेवारांसाठी निर्धारित गुणांपकी किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
गुणवत्ता यादीची प्रक्रिया :
सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकन्डरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईमार्फत घोषित अखिल भारतीय गुणवत्ता यादी आणि कॅटेगरी गुणवत्ता यादीवर आधारित या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. ही गुणवत्ता यादी तयार करताना ६० टक्के वेटेज JEEMAIN- २०१३ मध्ये मिळालेले गुण आणि ४० टक्के वेटेज हे बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवर दिले जातील.
अर्हता :
बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात ७० टक्के गुण. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण. त्याशिवाय दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळायला हवेत. (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण.) उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुला संवर्ग आणि इतर मागासवर्ग (नॉन क्रिमी लेअर) विद्यार्थ्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८८ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांचा जन्म हा १ ऑक्टोबर १९८३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
नाव नोंदणी : या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे नोंदणी करावी
लागेल. ही नोंदणी १७ मे २०१३ पासून सुरू होत आहे. ही नोंदणी ८ जुल २०१३ पर्यंत सुरू राहील.
संपर्क : द चेअरमन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वालीयामाला, तिरुवनंतपूरम- ६९५५४७ केरळ. दूरध्वनी- ०४७१-२५६८४७७, फॅक्स- २५६८४८०. वेबसाइट http://www.iist.ac.in/ admission /undergraduate ई-मेल- ugadmission@iist.ac.in