News Flash

अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची सीईटी ५ मे रोजी

राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ५ मे रोजी होणार

राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण आदी शाखांची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ५ मे रोजी होणार असून त्याचे तपशील मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण आदी शाखांची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.
गेली दोन वर्षे ही प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय परीक्षांच्या माध्यमातून घेण्यात येत होती. मात्र या वर्षीपासून राज्याच्या
सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असणार आहे.
त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे हे यापूर्वीच मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या सीईटी परीक्षेचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे तंत्रशिक्षण विभागाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 5:24 am

Web Title: cet on 5 may for engineering and medical courses
Next Stories
1 राज्य मंडळाकडून बहि:स्थ परीक्षार्थीसाठी खुल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रस्ताव
2 अभियांत्रिकी सुधारणेसाठी ‘एआयसीटीई’ला साकडे
3 ‘त्या’ ४४ शाळांना अनुदान देण्याचे आदेश
Just Now!
X