News Flash

आदित्य दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

बीडमधील आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कैफियत ऐकल्यानंतर या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

| January 17, 2013 12:02 pm

बीडमधील आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कैफियत ऐकल्यानंतर या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांनी खासदार संजय निरूपम, फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांच्यासह मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चार विद्यार्थिनींनी त्यांना महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या छळवणुकीचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. सुमारे दहा मिनिटे शांतपणे विद्यार्थिनींची कैफियत एकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. आदित्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी यावेळी खासदार संजय निरूपम यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:02 pm

Web Title: chief ministers favour to aditya dental collage students
टॅग : Chief Minister
Next Stories
1 अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना प्र-कुलगुरूंनी बोलविले
2 पुणे विद्यापीठाचे गुणदान प्रकरण दडपण्यासाठी दबाव?
3 बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आज धरणे
Just Now!
X