मुंबई विद्यापीठात जानेवारीत पार पडणाऱ्या भारतीय विज्ञान परिषदे ‘वुमेन्स सायन्स काँग्रेस’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महिला विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान अशी या विशेष परिषदेची संकल्पना असणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला संशोधक आणि शास्त्रज्ञानी त्यांच्या अभुतपूर्व कार्याचा ठसा उमटवला आहे त्याचीच दखल घेण्यासाठी म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन परिषदेदरम्यान ४ आणि ५ जानेवारी रोजी मराठी भाषा भवन येथे करण्यात आले आहे. या विशेष परिसंचादाचे उदघाटन केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी डॉ.शशी आहुजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग हा वाख्याण्याजोगा आहे. परंतु, भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेत्यांची यादी पाहिली तर त्यात जवळजवळ सर्व पुरुषांची नावे आहेत.
इतरवेळी विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही परीक्षांमध्ये अव्वल स्थानी मुलींची संख्या नेहमीच जास्त दितसे. यामुळेच अशा विद्यार्थिनींच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी यासाठी हे एक व्यासपीठ ठरू शकेल.
४० प्रबंध सादर होणार
विशेष परिषदेत संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. यात डॉ. शशीबाला सिंह, डॉ. पूर्वा साळवेकर, डॉ. वैजयंती पंडित, डॉ. मालविका दादलानी, ज्योती शर्मा, डॉ. अमिता दास, डॉ. नीरजा श्रीवास्तव आदींचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ.माधूरी पेजावर या विशेष परिषदेच्या समन्वयक आहेत. परिषदेत सुमारे ४० जण प्रबंध सादर करणार आहेत.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा