राज्यातील अभियांत्रिकी शाखेचे प्रथम वर्षांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज शुक्रवारपासून (५ जून) उपलब्ध होणार आहेत. यावर्षीही दोनच नियमित व एक समुपदेशन प्रवेशफे ऱ्या घेण्यात येणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम राहण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील अभियांत्रिकी शाखेचे अर्ज ५ जूनपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी १८ जूनपर्यंत मुदत आहे. यावर्षीही तीनच प्रवेश फे ऱ्या होणार आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वी ४ फे ऱ्या घेण्यात येत होत्या. तीन नियमित फे ऱ्या आणि एक समुपदेशन फेरी अशी प्रक्रिया केली जात होती. मात्र, गेल्यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने एक फेरी कमी करून २ नियमित आणि १ समुपदेशन अशा तीन फे ऱ्या घेतल्या होत्या.
यावर्षीही तंत्रशिक्षण संचालनालयाने तीनच फे ऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी एक फेरी कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला होता. दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे काही महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचा फायदाही झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच चार प्रवेशफे ऱ्या घेण्याची मागणी करण्यात येत होती.
 ‘पहिल्या फेरीला विद्यार्थ्यांना महाविद्यालये, त्यांचे कटऑफ यांची पुरेशी माहिती नसते. दुसऱ्या फेरीला विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होते. गेल्यावर्षी दोनच नियमित फे ऱ्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते.
विशेषत: गुणांच्यादृष्टीने जे विद्यार्थी मधल्या फळीत असतात, त्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यादृष्टीने तीन नियमित प्रवेश फेऱ्या असणे आवश्यक आहे,’ असे मत एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी व्यक्त केले आहे.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊन २७ जुलैला महाविद्यालये सुरू होणार आहेत. यावर्षी राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता साधारण १ लाख ५७ हजार ६१४ आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि प्रवेश अर्ज ६६६.३िीेंँं१ं२ँ३१ं.ॠ५.्रल्ल/ऋी2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.