अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी केवळ मुलींना प्रवेश देण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध आहे. अशा अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने यांची सविस्तर माहिती –
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये प्रत्येक शाखेत ३० टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या शाखांमध्ये प्रवेश दिला जातो. याशिवाय केवळ मुलीसाठीची अभियांत्रिकी महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. या
महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया सामायिक प्रवेशप्रक्रियेद्वारे होते. प्रवेश देताना आरक्षणाचे सर्व नियम पाळले जातात. या महाविद्यालयातील १५ टक्के जागा गेल्या वर्षीपर्यंत अकएएए या परीक्षेच्या गुणांवर भरल्या जात. २०१३ च्या शैक्षणिक वर्षांपासून या जागा खएए-टअकठ या परीक्षेतील गुणांवर आधारित भरल्या जातील. याला अपवाद एसएनडीटी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एस. एन. मित्तल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा आहे. या संस्थेतील सर्व जागा सीईटीच्या गुणांवर आधारित भरल्या जातात.
महिला अभियांत्रिकी महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत-
* कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणे. हे महाविद्यालय भारती विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे- इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (प्रवेशजागा- १२०), कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी (प्रवेशजागा- ६०)
महाविद्यालयाच्या वसतिगृहातील प्रवेशजागा – ५०
पत्ता- कात्रज, धनकवडी, कॅम्पस, पुणे- सातारा रोड, पुणे
४११०४३, दूरध्वनी- ०२०-२४३७१६८४,
वेबसाइट- coewpune.bharatividyapeeth.edu
ई-मेल- coewpune@bharatividyapeeth.edu
* भिवराबाई सावंत इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च फॉर विमेन, वाघोली.
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (प्रवेशजागा- १२०), इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग , इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी (प्रवेशजागा-प्रत्येकी ६०) महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील प्रवेशजागा- १८०.
पत्ता- गट नंबर ७२०/१ आणि २, पुणे नगर रोड, वाघोली,
तालुका, पुणे-४१२२०८, दूरध्वनी- ०२०-२७०११५७०,
वेबसाइट- http://www.jspn.edu.in
ईमेल- principalbsiotr@gmail.com
* वीरमाता जिजाऊ विमेन्स इंजिनीअरिंग कॉलेज शारनापूर, औरंगाबाद.
कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इन्फम्रेशन टेक्नालॉजी (प्रवेशजागा- प्रत्येकी ६०). वसतिगृहातील प्रवेशजागा- १००
पत्ता- गट नंबर ५९ पी, शहारानापूर, औरंगाबाद,
वेबसाइट-www.vjwengineering.org
ईमेल- http://www.vjwengineering.org
* कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, सुखाली, नागपूर :
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इन्फम्रेशन टेक्नालॉजी आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग (प्रवेशजागा- प्रत्येकी ६०).
वसतिगृहातील प्रवेशजागा- १७८.
पत्ता- मौजे सुखाली- गुपचूप, तालुका- हिंगणा, नागपूर४४००२३,
दूरध्वनी-०७१०४-२८००५४
संस्थेची वेबसाइट – http://www.ccewnpp.org
ईमेल – http://www.ccewnpp.org
* उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई.
या संस्थेत कॉम्प्युटर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इन्फम्रेशन टेक्नालॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (प्रवेशजागा-प्रत्येकी ६०). अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या संवर्गासाठी राखीव असलेल्या जागांचाही समावेश आहे. वसतिगृहातील प्रवेशजागा- ३०.
पत्ता- एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, सांताक्रुज
(पश्चिम), मुंबई, दूरध्वनी- ०२२-२६६०५२८३, वेबसाइट http://www.umit.ac.in ई-मेल- umitsndt@rediffmail.com
* कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ऑफ विमेन, पुणे :
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (प्रवेशजागा- प्रत्येकी १२०).
इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी आणि सेंकड शिफ्टच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (प्रवेशजागा- प्रत्येकी ६०). वसतिगृहमधील प्रवेशजागा- १८९
पत्ता- कर्वेनगर, पुणे- ४११०५२, दूरध्वनी- ०२०-२५३११०००
संस्थेची वेबसाइट- http://www.cumminscollege.org
ई-मेल- admin@cumminscollege.org
*  आर्किटेक्चर महाविद्यालये :
* महर्षी कर्वे स्त्री संस्थेचे डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर विमेन, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॅम्पस, कर्वेनगर, पुणे- ४११०५२, दूरध्वनी-०२०२५४७६९६६, वेबसाइट- http://www.bnca.ac.in, ई मेल bnca@vsnl.com,
* श्रीमती मनोरमाबाई मुंडले, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,
सेमिनरी हिल्स, नागपूर-४४०००६, दूरध्वनी- ०७१२२५१०२०८,
वेबसाइट- http://www.ladarch.com, ईमेल admin@infoladarch.com,  
प्रवेशजागा- ८०. मास्टर
ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशजागा- २०
*  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) :
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यातील आयटीआयमध्ये रोजगार मिळण्यास उपयुक्त ठरतील असे अनेक अभ्यासक्रम सुरू असतात. आयटीआयमध्ये मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव असतात. दादर- मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, औंध-पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी केवळ मुलींसाठीची आयटीआय आहेत.
*  तंत्रनिकेतने :
* यवतमाळ येथील सरकारी महिला तंत्रनिकेतन संस्थेत इलेक्ट्रिकल, ड्रेस डिझायिनग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रमेन्टेशन हे अभ्यासक्रम शिकवले जातात.
पत्ता- धामनगाव रोड,
यवतताळ- ४४५००१, दूरध्वनी-०७२३२-२४६३५६,
वेबसाइट- http://www.grwpy.ac.in
* लातूर येथील महिलांसाठीच्या शासकीय निवासी तंत्रनिकेतनात इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनीअरिंग, ड्रेस डिझायिनग अ‍ॅण्ड गाम्रेन्ट मॅन्युफॅक्चुरिंग, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकशेन इंजिनीअरिंग हे विषय शिकवले जातात.
पत्ता- शासकीय निवासी तंत्रनिकेतन, बार्शी रोड- लातूर
४१३५३१, दूरध्वनी- ०२३८२-२२११७५.
* पुणे येथे एमआयटी संस्थेचे महिलांसाठीचे तंत्रनिकेतन –
सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी. वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध आहे.
पत्ता- सावित्रीबाई फुले महिला तंत्रनिकेतन, १२४,
एमआयटी कॅम्पस, पौड रोड, कोथरुड, पुणे-४११००३८,
दूरध्वनी-०२०-३०२२७ ३५३१, वेबसाइट- mitsspp.edu.in,
ईमेल- sspp@mitssp.edu.in

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या