बँकिंग व वित्तीय विश्लेषण, औद्योगिक अकाऊंटस्, शेअरबाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यवस्थापन यासंबंधीच्या वैशिष्टय़पूर्ण वित्तीय अभ्यासक्रमांची माहिती-
द बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूट लिमिटेड ही संस्था बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या अंतर्गत कार्यरत असणारी शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था शेअर बाजाराशी निगडित विविध बाबींच प्रशिक्षण देण्यासाठी स्थापण्यात आली आहे. २०१५ सालापर्यंत साधारणत: एक लाखांहून अधिक या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात.
*  ग्लोबल फायनान्शिअल मार्केट्स :
या संस्थेने सुरू केलेला हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण- ५० टक्के प्राप्त विद्यार्थ्यांना करता येतो. या अभ्यासक्रमात वित्तीय बाजाराशी निगडित अनेक सिद्धांत, विश्लेषणात्मक कौशल्य, बाजाराच्या स्थितीचे अचूक  निदान यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
कालावधी- पाच सत्रे. पाचव्या सत्रात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना आघाडीच्या औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी मिळते.
या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय बाजाराचे मूलभूत ज्ञान, वित्तीय बाजाराचे अर्थशास्त्र, वित्तीय बाजाराच्या सांख्यिकी संकल्पना, वित्तीय लेखापरीक्षण, डिमॅट आणि डिपॉझिटरिज, वित्तीय विश्लेषण, कार्पोरेट वित्तीय व्यवस्थेशी तोंडओळख, इक्विटी मार्केट, परदेशी वित्तीय चलनवलन बाजार, डेट मार्केट, तांत्रिक
विश्लेषण, बॉण्ड्स, डेरिव्हेटिव्हज्, रिस्क मॅनेजमेंट, सिक्युरिटीज लॉ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इमेजिंग मार्केट, प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंच्युर कॅपिटल अशा सारख्या स्टॉक मार्केट म्हणजेच वायदे बाजाराशी निगडित विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
करिअर संधी : हा अभ्यासक्रम केल्यानंतर इन्व्हेस्टमेन्ट अ‍ॅनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजर, इन्व्हेस्टमेन्ट बँकर, बिझिनेस अ‍ॅनालिस्ट, रिस्क मॅनेजर (फायनान्शिअल सर्व्हिसेस), डाटा गव्हर्नन्स मॅनेजर, क्रेडिट रिस्क मॅनेजर, फायनान्स मॅनेजर अशा सारख्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बँक, वित्तीय सेवा, विमा क्षेत्रा, कॅपिटल मार्केट, म्युच्युअल फंड, अ‍ॅसेट मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग, ब्रोकरेज हाऊसेस यांमध्ये संधी मिळू शकतात.  संस्थेचा प्लेसमेन्ट सेल यादृष्टीने सक्रिय भूमिका बजावतो.
*  अल्प मुदतीचे अभ्यासक्रम :
* बेसिक कोर्स ऑन स्टॉक मार्केट : या अभ्यासक्रमाचा कालावधी चार दिवसांचा आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतो. शिवाय स्टॉक ब्रोकर, सबब्रोकर आणि कोणताही गुंतवणूकदार हा अभ्यासक्रम करू शकतो.
* अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स ऑन स्टॉक मार्केट. कालावधी- आठ दिवस.
* फायनान्शिअल स्टेटमेंट अ‍ॅनालिसीस- कालावधी एक दिवस.
* हाऊ टू रीड म्युच्युअल फंड फॅक्ट्स शीट.
संपर्क- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड १८ आणि १९ वा
मजला, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई,-४००००१
ईमेल- admissions@bseindia.com, training@bseindia.com.
वेबसाइट- gfmp.bsebti.com हेल्पलाइन-१८००२२९०३०

*  कंपनी सेक्रेटरीज फाऊंडेशन कोर्स :
या संस्थेच्या वतीने बारावीनंतरचा आठ महिने कालावधीचा कंपनी सेक्रेटरीज फॉऊंडेशन कोर्स हा व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमांतर्गत इंग्लिश आणि बिझनेस कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक्स, फायनान्शिएल अकौंटिंग आणि एलिमेंट ऑफ बिझनेस लॉज अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हे विषय शिकविले जातात. हा अभ्यासक्रम केल्यावर तुम्हाला कॉर्पोरेट प्लॅनर आणि स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणून भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते. कंपनी सेकट्ररीला अनेकदा इन हाऊस कायदेतज्ज्ञ म्हणूनसुद्धा काम करावे लागते. संचालक मंडळाचे मुख्य सल्लागार म्हणूनसुद्धा भविष्यात संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम या नऊ महिने कालावधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल प्रोगॅम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तो पात्र ठरेल.
पत्ता- द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया
१३, जॉली मेकर चेंबर्स, नंबर २, पहिला मजला, नरिमन पॉइंट,
मुंबई-४०००२१. दूरध्वनी- २२०२ १८२६, २२८४४०७३
मेल- wiro@icsi.edu वेबसाइट- http://www.icsi.edu
*  सर्टिफाईड इंडस्ट्रिअल अकौन्टन्ट प्लस :
द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर अकौन्टस ही संस्था कॉम्प्युटराइज्ड अकौन्टन्सी या विषयाचे शिक्षण देणारी आघाडीची संस्था समजली जाते. या संस्थेने आयसीए- सीआयएपी (सर्टिफाईड इन्डस्टिअल अकौन्टन्ट प्लस) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वाणिज्य शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो.
कालावधी – एक वर्ष.
प्रवेशजागा- ५०. परीक्षा ऑनलाइन घेतली जाते.
पत्ता- ए-विंग, तिसरा मजला, वांद्रे लिबर्टी हाऊसिंग
सोसायटी, हिल रोड, मुंबई- ५०, दूरध्वनी : ०२२- ६६७९११९९
*  बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स :
अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीच्या ग्वालिअर कॅम्पसमध्ये बॅचलर ऑफ
बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स हा
अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही
विषयातील बारावी उत्तीर्ण. वेबसाइट- http://www.amity.edu/gwalior, दूरध्वनी-०७५१-३२९०६६६
*  बीबीए-अकौंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स :
जी. डी. गोयंका युनिव्हर्सिटीने बॅचलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत इंटरनॅशनल बिझनेस, अकौंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स, मार्केटिंग या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
कालावधी- तीन वर्षे.
पत्ता- जी. डी. गोयंका एज्युकेशन सिटी, गुरगाव, दिल्ली/
एनसीआर, हरयाणा- १२२१०३, दूरध्वनी-०८८ ००९९२०२१.
वेबसाइट- http://www.gdgoenkauniversity.com,
ईमेल- info@gdgoenka.ac.in

*  बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस अनॅलिस्ट्स अ‍ॅण्डकन्सलन्टन्सी :
जी.डी. गोयंका वर्ल्ड इन्स्टिटय़ूट आणि इंग्लंडमधील लँकस्टर युनिव्हर्सटिीने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस अनॅलिस्ट्स अ‍ॅण्ड कन्सलन्टन्सी
* बॅचलर ऑफ सायन्स इन मॅनेजमेन्ट एॅण्ड इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी
* बॅचलर ऑफ आर्टस् (ऑनर्स) इन मॅनेजमेन्ट एन्टप्रिन्युरशीप
* बॅचलर ऑफ आर्टस् (ऑनर्स) इन बिझनेस इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ आर्टस् (ऑनर्स) इन मार्केटिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्टायजिंग
* बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन बिझनेस स्टडीज.
हे सर्व अभ्यासक्रम प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे आहेत.
अर्हता- बारावी उत्तीर्ण. तिसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम लँकेस्टर
युनिव्हर्सिटीमध्ये करता येतो. संपर्क- जी. डी. गोयंका वर्ल्ड
इन्स्टिटय़ूट, जी. डी. गोयन्का एज्युकेशन सिटी, सोहना- गुरगाँव
रोड सोहना, दूरध्वनी-०१२४-३३१५९००
वेबसाइट- http://www.goenkaglobal.com
ईमेल- admissions@gdgoenka.ac.in