News Flash

डॉ. पूनावाला यांना डी. लिट्

स्वस्त दरात लसनिर्मिती करून जगभरातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सीरम संस्थेचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांना

| March 5, 2015 12:06 pm

स्वस्त दरात लसनिर्मिती करून जगभरातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सीरम संस्थेचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांना बुधवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी.लिट्. ही मानद पदवी बहाल करण्यात आली. मुंबईतील सह्य़ाद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष पदवीदान सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद पदवी, मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली. डॉ. पूनावाला यांनी जगभरात स्वस्त दरात लस उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. मानवी आरोग्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून काम केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी डी.लिट्. देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:06 pm

Web Title: gov confers d litt on dr cyrus poonawalla
Next Stories
1 एमपीएससीचे निकाल रखडणार?
2 माजी मुख्याध्यापकाची वणवण
3 विद्यापीठाचा सुरक्षा रक्षक भंगारचोर
Just Now!
X