सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा आज अग्रक्रम लागतो.हा व्यवसाय वाढत चालल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांविषयी –

सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा आज अग्रक्रम लागतो. हा व्यवसाय वाढत चालल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम हा या क्षेत्राची तंत्रे शिकविणारा अभ्यासक्रम प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या करू शकतो. याविषयीच्या प्रशिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे –
हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग टेक्नॉलॉजी : केंद्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कायर्रत असणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत बॅचरल ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेद्वारे तीन र्वष कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या २२ सेंट्रल इन्स्टिटय़ूट हॉटेल मॅनेजमेंट आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असलेल्या १४ स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ५ फूड क्रॉफ्ट इन्स्टिटय़ूट आणि १५ खाजगी संसंस्थांमधील ७५८० जागा या परीक्षेद्वारे भरल्या जातात. १५ टक्के जागा एसस्सी.साठी, ७.५ टक्के जागा एसटी आणि ३ टक्के जागा अपंगांसाठी राखीव आहेत. मुंबईतील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८.) या संस्थेचा समावेश आहे. अर्हता : विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील बारावी उत्तीर्ण मात्र, विद्यार्थ्यांनी बारावीला इंग्रजी विषय आवश्यक. यंदा बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा १ जुल २०१३ रोजी २२ र्वष. एसटी आणि एसस्सीसाठी कमाल वयोमर्यादा २५ र्वष. अर्ज आणि माहिती पत्रकासाठी ९५० रु. (एसस्सी, एसटी आणि अपंग गटातील उमेदवारांसाठी अर्जाची किंमत ४५० रु. चा डिमांड डठाफ्ट नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग टेक्नॉलॉजी या नावे काढावा. अर्ज पाठविण्याचा पत्ता : नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी, ए- ३४, सेक्टर- ६२, नॉयडा- २०१३०९ लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- ११००१२ दूरध्वनी ५७८२७९९, ५७८२७४४, फॅक्स : ५८४१४११ संस्थेला अर्ज भेटण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०१३. ऑनलाइन फॉर्मसुद्धा भरता येतो. त्यासाठी applyadmissions.net/nchmjee २०१३ या वेबसाइटवर लॉग ऑन व्हा. १५ एप्रिल २०१३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. संस्थेची वेबसाइट http://www.nchmct.org. ही परीक्षा देशभरातील २७ शहरांमध्ये २७ एप्रिल २०१३ रोजी होणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर या शहरांचा समावेश आहे. परीक्षेचे स्वरूप : परीक्षेचा कालावधी तीन तास. या परीक्षेचा पेपर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा राहील. मे २०१३च्या दुसऱ्या आठवडय़ात परीक्षेचा निकाल घोषित केला जाईल. जून २०१३ च्या पहिल्या आठवडय़ापासून मुलाखती (समुपदेशन-कौन्सििलग)साठी विद्यार्थ्यांना बोलावले जाईल. शैक्षणिक सत्राचा प्रारंभ १ ऑगस्ट २०१३ पासून होणार आहे. या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती दिली जाते. अखिल भारतीय स्तरावरची ही शिष्यवृत्ती असून प्रत्येक सत्रात मिळालेल्या गुणांवर आधारित पहिल्या तीन क्रमांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. याविषयीच्या संयुक्त प्रवेश चाचणीमार्फत प्रवेश मिळू शकणाऱ्या काही केंद्रीय आणि राज्य हॉटेल मॅनेजमेंट संस्थांची यादी पुढीलप्रमाणे- वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई,  पी. ओ. अल्टो पार्वोरिम बार्देज, गोवा. * गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कम्पाउंड अंबावाडी, अहमदाबाद. * ११०० क्वार्टर्स अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनजवळ, भोपाळ. * एस. जे. पॉलिटेक्निक कॅम्पस शेषाद्री रोड, बंगलोर. * एफ रो, डीडी कॉलनी विद्यानगर हैद्राबाद. * बौलेवार्ड रोड नेहरू पार्क, श्रीनगर. कुर्फी, शिमला. बिशाप कॉटन रोड, शिलाँग. * कंकर बाग रोड, पाटणा. वीर सुरेंद्र साई नगर, भुवनेश्वर. * सेक्टर ४२ डी, चंदिगढ. सीआयटी कॅम्पस टीटीटीआय थारामणी, चेन्नई. * पी.एस. रोड, पी.बी. ४९, गंगटोक. कोवालम, थिरुवनंतपुरम. * व्हिलेज बॅरिअर, जीटी रोड, गुरुदासपूर. िभड रोड महाराजपुरा, ग्वाल्हेर. * जी. एस. रोड बस स्टॉप एबीसी, भंगारगरह, गौहाटी. * बनी पार्क पोलीस स्टेशनजवळ, सिकर रोड, जयपूर. * गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॅम्पस रेसिडेंसी रोड, जोधपूर. * तारोतोला रोड, कोलकाता. सीड फार्म सेक्टर जी अलिगंज, लखनौ. * फूड कॉफ्ट इन्स्टिटय़ूट, पुष्कर रोड, अजमेर. * लेविस ज्युबिली सॅनॅटोरियम, दार्जििलग. बद्कल लेक चौक, फरिदाबाद. * पाँडिचेरी इन्स्टिटय़ूट ऑफ हॉस्पिटॅलिटी क्रॉफ्टआ, उपलम रोड, पाँडिचेरी. * चेतक सर्कल बिहाईंड लवकूश स्टेडियम, उदयपूर. खएए मध्ये मिळालेल्या गुणांचा आधार घेऊन प्रवेश देणाऱ्या खाजगी संस्था पुढीलप्रमाणे- चंदिगढ कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट- मोहाली, चित्कारा स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, राजपुरा- पंजाब, देशभगत इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, गोिवदगढ, पंजाब. वेल्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चेन्नई. सेंट सोल्जर इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, जालंदर, पंजाब. एसआरएम इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, श्रीशक्ती कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, हैदराबाद. रयत अॅण्ड बाहरा इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मोहाली. के.सी.कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,नवनशहर, पंजाब. इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मीरत. ओरिएंटल स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कालिकत. रंजिता इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, भुवनेश्वर. मुन्नार कॅटिरग कॉलेज, केरळ. गुरुनानक कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कोलकता. सी.टी. इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, जालंधर, पंजाब. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी : डॉ. वाय. एस. आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट ही संस्था केंद्र सरकार आणि आंध्र सरकारच्या साहाय्याने स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचा पदवी अभ्यासक्रम बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी या नावानं ओळखला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन र्वष.
बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी : कालावधी- चार वर्षे. अर्हता- बारावीची परीक्षा उत्तीर्ण. खुल्या संवर्गातील उमेदवारांनी ५० टक्के, अनुसूचित जाती आणि जमाती सवंर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. वयोमर्यादा- २२ र्वष, राखीव संवर्गासाठी २५ र्वष. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा व मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम १ सप्टेंबर २०१३ रोजी सुरू होतील. अभ्यासक्रमाची फी अंदाजे दरवर्षी ७५ हजार रुपये. मुला- मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्ता- डॉ. वाय. एस. आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट, टेलेकॉम नगर, गाचीबोवली, हैदराबाद- आंध्र प्रदेश- ५०००३२ वेबसाइट http://www.nithm.ac.in

सुरेश वांदिले