21 February 2019

News Flash

‘आयटीआय’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे हे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या वर्षीही आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन घेण्यात येणार असून व्यवसाय आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणारी ही प्रवेश प्रक्रिया २७ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे हे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसा http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील जवळपास आयटीआयच्या जवळपास ७९ अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर इयत्ता दहावीमधील उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण विद्यार्थी मोठय़ा संख्येने आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. ही प्रवेश प्रकिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते. महाराष्ट्रातील ४१७ शासकीय तर ४५४ खासगी आयटीआयसाठी होणारे प्रवेश याच पद्धतीने होतात. सदर प्रवेश अर्ज www.admission.dvet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत असून यंदाही ही चुरस तशीच कायम पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी यंदा महाराष्ट्रातील एक लाख २३ हजार १०४ उपलब्ध जागांसाठी किमान तीन लाख प्रवेश अर्ज आले होते. यंदाही हा आकडा कायम राहण्याची शक्यता संचालनालयातर्फे सांगण्यात आली आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे – २७ जून ते १० जुल (संध्या. ५ वाजेपर्यंत)
  • प्रवेश अर्ज निश्चित करणे – २७ जून ते ११ जुल (संध्या. ५ वाजेपर्यंत)
  • प्राथमिक गुणवत्ता यादी – १२ जुल सकाळी ११ वा.
  • गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे – १२ जुल (संध्या. ५ वाजेपर्यंत)
  • पहिली प्रवेश फेरी – १४ ते १८ जुल
  • दुसरी प्रवेश फेरी – २० ते २२ जुल
  • तिसरी प्रवेश फेरी – २९ ते ३१  जुल
  • चौथी प्रवेश फेरी – ६ ते ८ ऑगस्ट

First Published on June 22, 2016 3:13 am

Web Title: iit admission timetable announced