देशभरातील अनेक विद्यापीठांनी विज्ञान विद्याशाखेतील एकात्मिक – पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती-
अण्णा युनिव्हर्सिटि :
चेन्नईस्थित या विद्यापीठाचे एकात्मिक अभ्यासक्रम –
* मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्पुटर सायन्स * मास्टर ऑफ सायन्स इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी * मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक मीडिया. अर्हता- (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यासह बारावी उत्तीर्ण, बारावी किंवा दहावीमध्ये इंग्रजी या विषयात ५० टक्के गुण. अर्ज व माहितीपत्रक http://www.annauniversity.edu
या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. हा अर्ज ७०० रुपयांच्या डीडीसह संस्थेला पाठवावा. हा डठाफ्ट द डायरेक्टर अ‍ॅडमिशन, अण्णा युनिव्हर्सटिी चेन्नई या नावे काढलेला असावा. पत्ता- द डायरेक्टर अ‍ॅडमिशन, अण्णा युनिव्हर्सिटि, चेन्नई  ६००००२६ दूरध्वनी-०४४-२२३५१४४५/ २२३५२१६१
  चौधरी देवीलाल युनिव्हर्सटिी :
या संस्थेने मास्टर ऑफ सायन्स (ऑनर्स)- मॅथेमॅटिक्स हा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्ज व माहितीपत्रक http://www.cdlu.in. या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड केलेला फॉर्म ३०० रुपयांच्या डिमांड ड्रफ्ट  आह  संस्थेला पाठवावा. हा डठाफ्ट रजिस्ट्रार, चौधरी देवीलाल युनिव्हर्सटिी, सिरसा या नावे काढलेला असावा.
  जयपी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी :
संस्थेच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
नॉयडा कॅम्पस : * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोटेक्नॉलॉजी (बीटेक- एमटेक- बायोटेक्नॉलॉजी) * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन काम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग (बीटेक- एमटेक- सीएसई) * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्टॉनिक्स अ‍ॅण्ड
कम्युनिकेशन इंजिनीअिरग. वाकणघाट कॅम्पस : * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर
ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोटेक्नॉलॉजी * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग.
प्रवेशप्रक्रिया : या संस्थांमधील अभ्यासक्रमांना JEEmain २०१३ च्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. संस्थेचे माहितीपत्रकwww.jiit.ac.in/ http://www.juet.ac.in/ http://www.juet.ac.in या वेबसाइटवर आहेत. पत्ता- रजिस्ट्रार, जेआयआयटी, ए-१०, सेक्टर-६२, नॉयडा- २०१३०७. दूरध्वनी- ०१२०- २४०००७३/ २४०००७३/ २४००९७२ ई-मेल- webadmission@jiit.ac.in
  गौतम बुद्ध युनिव्हर्सटिी :
या संस्थेने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील पाच वष्रे कालावधीचे पुढील एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी-मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन मेकॉनिकल इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नालॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी. संपर्क- द चेअरपर्सन- अॅडमिशन्स, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, यमुना एक्स्प्रेस वे गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी, ग्रेटर नॉयडा, जिल्हा- गौतम बुद्ध नगर २०१३१०. वेबसाईट- http://www.gbu.ac.in, ई-मेल- admissions@gbu.ac.in, दूरध्वनी- ०१२०-२३४४२००/ २३४४२३४.
  थापर युनिव्हर्सटिी :
या संस्थेने बॅचरल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन- मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन हा पाच वर्षे कालावधीचा डय़ुअल  डिग्री अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअिरग या दोन शाखांचा समन्वय साधण्यात आला आहे. एकूण ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी २६ ते ३० जून २०१३ या कालावधीत ऑनलाइन टेस्ट घेतली जाईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची आणि बहुपर्यायी अशी राहील. या पेपरमध्ये चार भाग राहतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस बारावी विज्ञान शाखेत ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. संपर्क- थापर युनिव्हर्सटिी, पोस्ट बॉक्स नंबर ३२, पतियाळा-१४७००४. वेबसाइट- http://www.thapar.edu ई-मेल- admissions@thapar.edu हेल्पलाइन-०८२८८००८१२० दूरध्वनी- ०१७५-२३९३०२१
एनआयआयटी युनिव्हर्सिटी :
या संस्थेचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री इन बॉयोटेक्नॉलॉजी * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग * बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग या विषयांमध्ये करता येतो. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षे. अर्हता- फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षेत ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. JEE- main २०१३ ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील गुणांचा विचार प्रवेशाच्या वेळी केला जाऊ शकतो. पत्ता- एनआयआयट युनिव्हर्सटिी, अॅडमिशन्स ऑफिस, एनआयआयटी, बििल्डग, प्लॉट नंबर ८५, फर्स्ट फ्लोअर, सेक्टर-३२, इन्स्टिटय़ुशनल एरिया, गुरगाव-१२२००१. ई-मेल- admissions@niituniversity.in वेबसाइट- http://www.niituniversity.in
  देवी अहिल्या विश्वविद्यालय :
इंदोर स्थित देवी अहिल्या विश्वविद्यालयाने विज्ञान शाखेतील विषयांसाठी एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- * मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक मीडिया (एकूण जागा ४०) * मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एकूण जागा ९०)/ कालावधी- सहा र्वष
* मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी (एकूण जागा ६०)/ कालावधी-साडेपाच वर्षे.
परीक्षा केंद्रे : या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणी घेतली जाते. ही प्रवेशपरीक्षा दिल्ली, इंदौर, भोपाळ, ग्वालियर, रायपूर, अलाहाबाद आणि कोटा या केंद्रांवर ६ जून २०१३ रोजी घेतली जाईल. या विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी १५ हजार रुपये अशी फी राहील.
अर्ज प्रक्रिया : या परीक्षेसाठी http://www.mponline.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. अर्जाची फी १०५० रुपये. ही ऑनलाइन भरता येते. सीईटी संपर्क- ०७५५-४०१९४०१. पत्ता- रजिस्ट्रार, देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदौर- ४५२००१. दूरध्वनी-०७३१- २५२७५३२, फॅक्स- २५२९५४०. वेबसाइट- http://www.dauniv.ac.in, ई-मेल- cet13.davv@gmail.com