अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (जेईई-मेन) आज (शनिवारी) होणार आहे. या परीक्षेचे स्वरूप लेखी असणार आहे. तर १० आणि ११ एप्रिलला ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशांकरिता जेईईचे गुण प्रमाण मानण्यात येणार आहेत.  परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी २०१३ आणि २०१४च्या बारावी किंवा समकक्ष परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंतिम गुणपत्रिकेची प्रत परीक्षा केंद्रावर नेणे बंधनकारक आहे. तसेच, २०१५ला बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर न्यायचे आहे.