‘जेइइ मेन’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांवर आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा रस्ता सुकर होतो. त्यासंबंधित प्रवेशसंधी आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती –
नुकतीच ‘जेईई मेन’ परीक्षा संपली. सेंट्रल बोर्ड ऑफसेकंडरी एज्युकेशन या केंद्रीय बोर्डामार्फत ही परीक्षा घेतली गेली. ही परीक्षा 2012 पर्यंत ऑल इंडिया इंजिनीअिरग एन्ट्रन्सएक्झामिनेशन (एआयईईई) या नावानं ओळखली जायची. 2013 च्या शैक्षणिक वर्षांपासून ‘एआयईईई’ ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यापुढे ‘एआयईईई’द्वारे ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जात असे, त्यासाठी ‘जेईई मेन’(जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेला देशभरातील साधारणत: 11 लाख विद्यार्थी बसले आहेत.
महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधीलएकूण जागांपकी 15 टक्के जागा ‘जेईई मेन’ मार्फत भरल्याजातील. सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप प्रक्रियतेच याचासमावेश केला जाईल. जेईई मेन (एआयट्रीपलईच्या) परीक्षादिलेल्या महाराष्ट्रातीलच मुलो 15 टक्के जागांसाठी भारतातीलकोणत्याही राज्यातली मुलं पात्र ठरू शकतात. ‘जेईई मेन’च्या जागांसाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्रीय मुले व इतर राज्यातील मुलांनी अर्जकेल्यास, त्या १५ टक्के जागा या ‘जेईई मेन’मधील गुणांवरआधारित भरल्या जातील. समजा, परराज्यातील मुलांचे गुण हे महाराष्ट्रातील मुलांपेक्षा जास्त असल्यास त्यांनाच या 15 टक्के जागांवर प्रवेश मिळेल.
जेईई मेन या परीक्षेत मिळणारा ऑल इंडिया रँक हाच प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल. राज्य रँक हा प्रवेशासाठी ग्राह्य धरला जात नाही. ‘जेईई मेन’मध्ये पात्र ठरलेल्या राज्यातील एकूण मुलांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची स्थिती काय, हे दर्शविणारा हाराज्य रँक असतो. ऑल इंडिया रँक हा जितका कमी, तितकी चांगल्या संस्थेत आणि मनाजोगत्या शाखेमध्ये प्रवेश मिळण्याचीशक्यता अधिक. ‘जेईई मेन’मधील एक गुणसुद्धा रँकमध्ये बरीच तफावत घडवून आणतो.
राज्यातील खासगी व स्वायत्त खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 15 टक्के जागा भरण्यासाठी ‘जेईई मेन’च्या गुणांचा विचार करताना आरक्षणांचा विचार केला जात नसला तरी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयटीमधील प्रवेशासाठी मात्र ‘जेईई मेन’च्या गुणांचा विचार हा आरक्षणाच्या नियमांप्रमाणे केला जातो.
‘जेईई मेन’च्या मिळालेल्या गुणांवर 30 एनआयटीसोबतच, 5 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी(आयआयआयटी) व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन अ‍ॅण्डटुरिझम डेव्हलपमेंट मॅनजमेंट, 13 केंद्रीय आणि राज्य शासनाच्याअनुदानित संस्था, 45 स्वयं वित्तसाहाय्यित संस्था यामध्ये प्रवेश दिला जाईल.
महाराष्ट्रात नागपूर येथे विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफटेक्नॉलॉजी संस्था आहे. या संस्थेत 700 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाजातो. यापकी 350 विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आणि उर्वरित 350विद्यार्थी हे इतर राज्यातील असतात. महाराष्ट्रातील 350 ही विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मधील ऑल इंडिया रँकच प्रवेशासाठी ग्राह्य़ धरला जातो. त्यामुळे गुणवत्ता यादीत वरचा क्रमांकअसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरित 350 जागांसाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. आरक्षणाचे सर्व नियम पाळले जातात.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन शाखांची निवड व त्या लॉक करणे आणि ऑनलाइन जागा वाटप, हे या प्रक्रियामधील तीन महत्त्वाचे टप्पेहोत. गुणवत्तेनुसार जागेचे वाटप होत असले तरी विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या इच्छित शाखा आणि महाविद्यालयांचा विचार मल्टिपल राऊंड्समध्ये केला जातो. जागा उपलब्ध झाल्यावरविद्यार्थ्यांला कोणत्याही एका रिपोìटग केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन विहित कालावधीत कागदपत्रे तपासून घ्यावी लागतात. त्याचवेळी प्रारंभिक फीसुद्धा भरावी लागते. 2012च्या शैक्षणिक वर्षांतही प्रारंभिक फी इतर मागासवर्गीय, खुला गट, खुल्या गटातीलशारीरिक अपंग, इतर मागासवर्गीय गटातील शारीरिक अपंग, खुल्या गटातील अल्पसंख्याक, अल्पसंख्याक शारीरिक अपंग यांना 35 हजार रुपये तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती-शारीरिकदृष्टय़ा अपंग, अनुसूचित जमाती-शारीरिकदृष्टय़ा अपंग, या गटातील उमेदवारांना 25 हजार रुपये होती. तिसऱ्या टप्प्यांपर्यंत ऑनलाइन कार्यपद्धती प्रवेशासाठी अवलंबली जाते. चौथ्या टप्प्यात मात्र शिल्लक जागांसाठी प्रत्यक्षउपस्थित राहावे लागते. या टप्प्यात प्रवेश मिळालेल्या सर्वउमेदवारांना ऑन स्पॉट 45 हजार रुपये फी भरावी लागली. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 40 हजार रुपये भरावे लागले. ही फी डिमांड ड्राफ्टनेच भरावी लागते.
देशभरातील 30 नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एकूण 15 हजार 362 जागा आहेत. यापकी अखिल भारतीय पातळीवरील खुल्या प्रवर्गासाठी जागा 3803 आहेत.
शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा खुल्या प्रवर्गासाठी 124 जागा, अनुसूचित जाती संवर्गासाठी 1108, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशाअनुसूचित जाती संवर्गासाठी 36 जागा, अनुसूचित जमातीसंवर्गासाठी 555 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अनुसूचितजमाती संवर्गासाठी 16 जागा, इतर मागासवर्ग संवर्गासाठी 1666जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा इतर मागासवर्ग संवर्गासाठी 59जागा, अल्पसंख्याक संवर्गासाठी 306 जागा, शारीरिकदृष्टय़ाअपंग अशा अल्पसंख्याक संवर्गासाठी 12 जागा आहेत.
केंद्र सरकारमार्फत वित्तीय साहाय्यत्ता प्राप्त 5 संस्थांमध्ये एकूण 849 जागा आहेत. यापकी अखिल भारतीय पातळीवरीलखुल्या प्रवर्गासाठी जागा 417 आहेत. शारीरिकदृष्टय़ा अपंग अशाखुल्या प्रवर्गासाठी 11 जागा, अनुसूचित जाती संवर्गासाठी 123,
शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अनुसूचित जाती संवर्गासाठी 4 जागा, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 61 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंगअशा अनुसूचित जमाती संवर्गासाठी 2 जागा, इतर मागासवर्गसंवर्गासाठी 185 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा इतर मागासवर्ग संवर्गासाठी 8 जागा, अल्पसंख्याक संवर्गासाठी 37जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अल्पसंख्याक संवर्गासाठी 1 जागा आहेत.
केंद्रीय /राज्यांकडून अर्थसाहाय्यित इतर संस्थांमध्ये 2183 जागा आहेत. यापकी अखिल भारतीय पातळीवरील खुल्या प्रवर्गासाठी जागा 1193 आहेत. शारीरिकदृष्टय़ा अपंग अशाखुल्या प्रवर्गासाठी 25 जागा, अनुसूचित जाती संवर्गासाठी 236, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अनुसूचित जाती संवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 124 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंगअशा अनुसूचित जमाती संवर्गासाठी 2 जागा, इतर मागासवर्गसंवर्गासाठी 219 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा इतर मागासवर्ग संवर्गासाठी 7 जागा, अल्पसंख्याक संवर्गासाठी 26 जागा.
आíकटेक्चर या शाखेसाठी अखिल भारतीय स्तरावरील 1010 जागा आहेत. यापकी अखिल भारतीय पातळीवरीलखुल्या प्रवर्गासाठी जागा 343 आहेत. शारीरिकदृष्टय़ा अपंग अशाखुल्या प्रवर्गासाठी 10 जागा, अनुसूचित जाती संवर्गासाठी 91,
शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अनुसूचित जाती संवर्गासाठी 3 जागा, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 41 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंगअशा अनुसूचित जमाती संवर्गासाठी 3 जागा, इतर मागासवर्गसंवर्गासाठी 131 जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा इतर मागासवर्ग संवर्गासाठी 7 जागा, अल्पसंख्याक संवर्गासाठी 22जागा, शारीरिकदृष्टय़ा अपंग अशा अल्पसंख्याक संवर्गासाठी 1 जागा आहे.