दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून यंदापासून ऑक्टोबरऐवजी जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता १५ जूनपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना
सप्टेंबर-  ऑक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर थेट मार्च महिन्यात पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळत होती. मात्र, चार महिन्यांनी होणारी ही परीक्षा देऊनही त्यांचे वर्ष वाया जात होते. त्यामुळे, या वर्षीपासून या विद्यार्थ्यांकरिता जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी जाहीर केला. त्यानंतर तातडीने या परीक्षेसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. श्रेणीसुधार योजनेच्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेसाठी नोंदणी करता येईल.विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी १५ ते २३ जून दरम्यान ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. विलंब शुल्कासह २४ ते २७ जून दरम्यान अर्ज करता येईल. परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना १ जुलैपर्यंत भरायचे आहे. विद्यार्थ्यांनी हे अर्ज शाळेमार्फत भरायचे आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याचे संकेतस्थळ – http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in