23 September 2020

News Flash

प्रवेशपूर्व नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची संख्या शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० इतकी झाली आहे.

| June 16, 2014 03:15 am

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची संख्या शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० इतकी झाली आहे. ही नोंदणी या नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस उरले असल्याने ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणीच्या पहिल्या दिवशी चार हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी पाच लाख ८०८ अर्ज भरले आहेत. विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्या िपट्र कॉपीसह विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत कॉलेजात प्रवेश अर्ज भरता येईल. अर्ज सादर केल्यानंतर कॉलेजची पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी कॉलेजांमध्ये जाहीर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 3:15 am

Web Title: last three days for pre admission online registration
Next Stories
1 दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांची संलग्नता रद्दची शिफारस!
2 अभियांत्रिकी महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात!
3 शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत
Just Now!
X