News Flash

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे तपशील गुलदस्त्यातच

राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुकला या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती

अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणेच राज्यातील विधी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही या वर्षीपासून केंद्रीय पद्धतीने होणार आहे. मात्र डिसेंबर महिना उजाडूनही राज्यात पहिल्यांदाच घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेबाबतचे कोणतेही तपशील उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होते आहे.
आतापर्यंत पारंपरिक अभ्यासक्रमांप्रमाणेच राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे महाविद्यालयाच्या पातळीवर करण्यात येत होते. मात्र आता राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेशही सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यातून करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१६-१७) नव्याने स्थापन करण्यात आलेल्या प्रवेश नियमन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. बारावीनंतर करण्यात येणारा अभ्यासक्रम (बीएसएल) आणि पदवीनंतर करण्यात येणारा अभ्यासक्रम (एलएलबी) या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. मात्र डिसेंबर महिना उजाडला तरीही अद्याप या परीक्षेचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आतापर्यंत राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुकला या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. प्रवेश परीक्षा होणार आहे, याची पूर्वकल्पना असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर नियमित अभ्यासक्रमांबरोबरच या परीक्षांच्या तयारीलाही वेळ मिळत आहे. मात्र विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्यात पहिल्यांदाच प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे परीक्षेचे स्वरूप काय असेल, अभ्यासक्रम काय असेल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

परीक्षेचे स्वरूप ठरलेलेच नाही?
अभियांत्रिकी किंवा इतर सामाईक प्रवेश परीक्षा या विज्ञान शाखेतील विषयांवर आधारित असतात. मात्र विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी कोणते विषय असावेत, कोणत्या विषयासाठी किती भारांश द्यावा, परीक्षा कशी असावी असे तपशील अद्यापही अंतिम झाले नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्यांदाच होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम उच्च शिक्षण विभागाने तपशिलात जाहीर करणे आवश्यक आहे. फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होतील. त्या परीक्षांच्या तोंडावर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो. मुळातच प्रवेश परीक्षा होणार आहे याची विद्यार्थ्यांना वर्षभर आधी माहिती मिळणे अपेक्षित आहे. पण या परीक्षेचे तपशील जाहीरच न झाल्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत.
– विवेक वेलणकर, करिअर विषयक समुपदेशक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 5:53 am

Web Title: law entrance test details are not announced by the department of higher education
Next Stories
1 पदवी प्रमाणपत्रांची ऑनलाइन तपासणी
2 शाळा बंदचा मुंबईवर परिणाम नाही
3 ओबीसी शिष्यवृत्तीसाठी ६ लाख उत्पन्न मर्यादेचा प्रस्ताव
Just Now!
X