आगामी वर्ष राज्यातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमधील दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे ठरणार आहे. या घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवण्याबाबतचे नियम स्पष्ट करणारा आदेश जानेवारी, २०१३च्या पहिल्याच आठवडय़ात काढण्याची पूर्ण तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. त्यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षांत आर्थिक दुर्बल घटकांना खासगी शाळांमधील शिक्षणाचे दरवाजे खुले होणार आहेत.

नीटसंबंधातील संदिग्धता संपण्याची चिन्हे
५ मे, २०१३ रोजी वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठी केंद्रीय स्तरावर नीटची पहिलीवाहिली परीक्षा होईल. महाराष्ट्राने यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भाराभर प्रवेश परीक्षांचा ताण कमी केला असला तरी खासगी संस्थाचालकांनी आपला स्वतंत्र परीक्षेचा हट्ट कायम ठेवला आहे. मात्र, जानेवारीत होणाऱ्या सर्वोच्च न्यायायलयाच्या सुनावणीनंतर ही संदिग्धताही दूर होऊन वैद्यकीय प्रवेशांबाबतचे चित्र पुरेसे स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

* प्राध्यापकांसाठी सेट – १७ फेब्रुवारी
* जेईई (मेन) – ७ एप्रिल
* वैद्यकीयसाठीची नीट – ५ मे
* एमएचटी-सीईटी – तारीख घोषित नाही

दहावी-बारावीच्या परीक्षा
दहावी
एसएससी – २ ते २५ मार्च
सीबीएसई – अद्याप जाहीर नाही
आयसीएसई – २७ फेब्रुवारी ते २५ मार्च

बारावी
एचएससी – २१ फेब्रुवारी ते २५ मार्च
सीबीएसई – अद्याप जाहीर नाही
आयसीएसई – ४ फेब्रुवारी ते २५ मार्च