20 February 2019

News Flash

बारावीसाठी दोन परीक्षा पद्धतींचा पर्याय?

सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम यात फारसा फरक नाही.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे सूतोवाच

वैद्यकीय व दंतवैद्यकीयसाठी जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि बारावीनंतर अन्य अभ्यासक्रमांना जाऊ इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी दोन वेगळ्या परीक्षा पद्धत राबविण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यावर जूनमध्ये बारावीचे वर्ग सुरू होईपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम यात फारसा फरक नाही. ‘एनसीईआरटी’ची पुस्तके दोघांसाठीही लागू आहेत. काही धडे किंवा विषय सीबीएसईने अकरावीत घेतले आहेत, तर ते विषय मंडळाने अकरावी व बारावी अशा दोन्ही वर्गासाठी ठेवले आहेत. नीटसाठी अकरावी व बारावी अशा दोन्ही वर्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो व ते कठीण होते. वैद्यकीय व दंतवैद्यकीयसाठी फक्त सहा हजार विद्यार्थी प्रवेश घेतात, तर सहा लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. ज्यांना वैद्यकीय व दंतवैद्यकीयव्यतिरिक्त अन्य विद्याशाखांसाठी प्रवेश घ्यायचा आहे किंवा बी.एस्सी. करावयाचे आहे, त्यांना ‘नीट’च्या धर्तीवर अभ्यासक्रम कशाला ठेवायचा, असा सवाल करून तावडे म्हणाले, त्यासाठी दोन परीक्षा पद्धतींचे पर्याय ठेवता येतील का, असा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात राज्य मंडळाचे अध्यक्ष व अन्य अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांनी एकत्रित चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

First Published on May 25, 2016 2:59 am

Web Title: may come two exam pattern for twelth exam