20 February 2019

News Flash

आज ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल

राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी दिली आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाकरिता राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी (१ जून) रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

५ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी दिली आहे. या परीक्षेतून राज्यातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश केले जाणार होते. परंतु, ‘नीट’मुळे खासगी महाविद्यालयांना आता या सीईटीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश एमएचटी-सीईटीतून होतील. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची मात्र अभिमत विद्यापीठे वगळता सर्व जागांचे प्रवेश या प्रवेश परीक्षेतून केले जाणार आहेत.

First Published on June 1, 2016 3:12 am

Web Title: mht cet exam result