नवी दिल्ली :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन, माहिती तंत्रज्ञान साधने व किमती वस्तू जवळ बाळगू नयेत असे सांगण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, मोबाईल फोन, संगणक व आयटी साधने किंवा ब्लुटूथ वापरता येणार नाही. तसे केल्यास तो नियमांचा भंग ठरणार आहे, असे आयोगाने म्हटले आहे. किंमती वस्तूसुद्धा बाळगू नयेत तसेत बॅगही परीक्षा केंद्रावर आणू नये कारण त्याच्या सुरक्षिततेची हमी आयोग देऊ शकत नाही. येत्या २३ ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे.