विषय : काळ, काम व वेग संदर्भातील प्रश्न
प्र. 2.    कळवणहून पुणे येथे जाणाऱ्या दोन गाडय़ांपकी एक गाडी सकाळी 6 वाजता ताशी 50 किमी वेगाने, तर दुसरी गाडी 60 किमी वेगाने सकाळी 7 वाजता सुटली, तर त्या एकमेकींना किती अंतरावर भेटतील?
पर्याय :    अ) 230 कि.मी.    ब) 249 कि.मी.        
    क) 251 कि.मी.    ड) 250 कि.मी.
स्पष्टीकरण : दोन्ही गाडय़ा भेटण्यास लागणारा वेळ काढताना पहिली गाडी 50 किमी वेगाने 1 तास अगोदर निघाली म्हणजे तिने एक तासात 50 किमी अंतर पार केलेले होते, हे 50 किमी अंतर दुसऱ्या गाडीला वेगातील फरक (60-50 = 10) ने पार करावयाचे आहे.
..ताशी 10 किमी वेगाने 50 किमी अंतर पार करण्यास लागणारा
वेळ = 5010 = 5 तास म्हणून भेटण्याचे ठिकाण ताशी 50 किमी वेगाने 5 तासांनी येणार म्हणून ते अंतर = 50 x 5 = 250 किमी.
हे उदाहरण खालील सूत्र वापरून पटकन सोडवता येते.
सूत्र : दोन गाडय़ा    
भेटण्यास लागणारा वेळ =    वेळेतील फरक x  पहिल्या गाडीचा वेग
    वेगातील फरक
प्र. 3.    अ या ठिकाणाहून एक सायकलस्वार ब या ठिकाणाकडे ताशी 8 किमी वेगाने, तर दुसरा सायकलस्वार ब कडून अ कडे ताशी 12 किमी वेगाने निघाला. जर अ व ब मधील अंतर 60 किमी असल्यास दोघांची भेट अ पासून किती अंतरावर होईल?
पर्याय :    अ) 30 कि.मी.    ब) 29 कि.मी.
    क) 25 कि.मी.    ड) 24 कि.मी.
स्पष्टीकरण : दोघांनी मिळून कापावयाचे अंतर = 60 किमी
1 तासात दोघांनी कापलेले अंतर = 8 + 12 = 20 किमी/तास
म्हणून 60 किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ 6020 = 3 तास
यावरून असे म्हणता येईल की, दोघांची भेट 3 तासांनी होणार, तर अ कडून निघालेल्या सायकलस्वाराने 3 तासांत कापलेले अंतर = 8 x 3 = 24 किमी. म्हणून दोघांची भेट अ पासून 24 किमी अंतरावर होईल. हे उदाहरण खालील सूत्र वापरून पटकन सोडवता येते.
सूत्र :    
    दोघांना भेटण्यास लागणारा वेळ =    एकूण अंतर
        दोन्हीच्या वेगांची बेरीज
प्र. 4.    एका कारचा सुरुवातीचा वेग 70 किमी / तास आहे. प्रत्येक दोन तासाला 10 किमी / तास वेग वाढवला, तर 345 किमी अंतर पार करण्यास त्या गाडीला किती वेळ लागेल?
पर्याय :    1) 2 14  तास    2) 4 14 तास
    3) माहिती अपुरी    4) यापकी नाही
स्पष्टीकरण :
पहिल्या दोन तासांत पार केलेले अंतर   = 70 x 2 = 140 किमी नंतरच्या दोन तासांत पार केलेले अंतर  =  80 x 2 = 160 किमी राहिलेले अंतर    = 345 – ( 140 + 160 ) = 45 किमी
हे 45 किमी अंतर तोडताना गाडीचा वेग 90 किमी / तास असेल.
म्हणुन 45 किमी अंतर तोडण्यास
लागणारा वेळ    =    अंतर    =    45    =    1    तास
        वेग        90        2
म्हणून 345 किमी अंतर पार करण्यास गाडीला लागलेला एकूण वेळ = 2 + 2 + 12 तास = 4 12 तास
प्र. 5.    5 किमी/ तास वेगाने चालणारा माणूस एक पूल 15 मिनिटांत ओलांडतो, तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
पर्याय :    1) 600    2) 150    3) 1000    4) 1250
स्पष्टीकरण : वेग    =  5 किमी / तास = 5 x   5 18 मी / सेकंद
    =   2518 मी/ सेकंद
म्हणून 15 मिनिटांत
पार केलेले अंतर    = 2518 x 15 x 60 = 1250 मी.
प्रश्नांची उत्तरे :  प्र. २- ड, प्र. ३- ड, प्र. ४- २, प्र. ५- ४.
(क्रमश:)