13 August 2020

News Flash

संशोधनचौर्याला प्रतिबंध

जुन्या संशोधन वाङ्मयात किरकोळ फेरफार करून आपला ‘नवीन’ प्रबंध सादर करणाऱ्यांवर आता आळा बसविणे अधिक सोपे होणार आहे.

| November 6, 2014 04:39 am

जुन्या संशोधन वाङ्मयात किरकोळ फेरफार करून आपला ‘नवीन’ प्रबंध सादर करणाऱ्यांवर आता आळा बसविणे अधिक सोपे होणार आहे. वाङ्मय चोरी रोखण्याच्या उद्देशाने एक सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या सॉफ्टवेअरच्या साह्य़ाने नव्याने सादर झालेले संशोधन वाङ्मय चोरीने घेतले आहे का हे तापसणे शक्य होणार आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी विद्यापीठात पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये जुन्या संशोधन वाङ्मयात थोडा फेरफार करून प्रबंध सादर करणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. यावर नियंत्रण यावे यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ आणि ‘शोधगंगोत्री’ या योजनांमुळे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाङ्मय चोरी रोखणे शक्य होणार आहे. अनुदान आयोगाने २००९मध्ये तयार केलेल्या नव्या नियमांनुसार देशात एम.फिल आणि पीएच.डी.साठी सादर करण्यात येणारे प्रबंध शोधगंगा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. यामुळे देशातीलच नव्हे तर जगातील अभ्यासकांना हे प्रबंध संदर्भासाठी उपलब्ध होते. याच योजनेमुळे उपलब्ध असलेले प्रबंध आणि नव्याने सादर झालेले प्रबंध यांची तुलना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे सॉफ्टवेअर ज्यावेळेस नवीन प्रबंधाचा अभ्यास करेल तेव्हा त्यात जुन्या प्रबंधातील काही मजकूर आहे का हे समजेल. तसेच कुठे स्वामित्व हक्काचा भंग झाला आहे का याबाबतचा तपशीलही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे संशोधन वाङ्मय चोरीला प्रतिबंध करणारी यंत्रणा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2014 4:39 am

Web Title: mumbai university barricades to research theft
Next Stories
1 रुईया आता ‘स्टार महाविद्यालय’
2 सहा लाख अपंग मुले शाळाबाह्य
3 शिक्षकांसाठी राज्यव्यापी लेखन स्पर्धा
Just Now!
X