23 February 2019

News Flash

प्रवेशपूर्व नोंदणीचे संकेतस्थळ पहिल्या दिवशीच कोलमडले

मुंबई विद्यापीठातर्फे याहीवर्षी प्रथमवर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे.

मुंबई विद्यापीठाचा घोळ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

मुंबई विद्यापीठात ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची करण्यात आली असून या नोंदणीची मंगळवारपासून सुरुवात झाली. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरवर्षी गोंधळास कारणीभूत ठरणाऱ्या ‘एमकेसीएल’ला यावर्षी प्रक्रियेतून बाहेर काढत नव्या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. यानंतरही हा गोंधळ झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे याहीवर्षी प्रथमवर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे. त्यानुसार या नोंदणीसाठी मंगळवारपासून ँ३३स्र्://े४े.ल्ली३.्रल्ल या संकेतस्थळावर िलक देण्यात आली होती. सकाळी १०.३० पासून हे संकेतस्थळ सुरू झाले. मात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास एकाच वेळी गर्दी केल्यामुळे संकेतस्थळ काम करणे बंद झाले होते. तर काही वेळाने तर संकेतस्थळ कोलमडल्याने विद्यार्थ्यांना ही प्रवेशपूर्व नोंदणी करण्यास बरेच अडथळे येऊ लागले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा गोंधळ असाच सुरू राहिल्याने विद्यार्थी पहिल्याच दिवशी प्रवेशपूर्व नोंदणीपासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पहिलाच दिवस फुकट गेल्याने मुदत वाढवावी, अशी मागणीही विद्यार्थी करू लागले आहेत. यातच या नोंदणीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचण आल्यास मुंबई विद्यापीठाने ९७६९१९९४२१ आणि ९७६९४४९६४४ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. मात्र मंगळवारी दिवसभर उडालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर या क्रमांकातील एक क्रमांक बंद होता. तर एक क्रमांक सतत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांना या हेल्पलाइनचा फायदा झाला नसल्याची खंत अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

‘अतिरिक्त सव्‍‌र्हर लावण्यात येणार’

एकाच वेळी लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट दिल्याने हा प्रकार घडला असून यासाठी अधिक सव्‍‌र्हर लावण्याचे काम सध्या विद्यापीठ स्तरावर युद्धपातळीवर सुरू असल्याचे माहिती उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बन्सोड यांनी दिली. पहिल्या दिवशी ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या संकेतस्थळासाठी १२ सव्‍‌र्हर काम करत असून आणखी पाच अतिरिक्त सव्‍‌र्हर लावण्यात येणार असल्याचेही बन्सोड यांनी स्पष्ट केले.

First Published on June 15, 2016 3:10 am

Web Title: mumbai university pre registration website running slow